Water Scarcity: खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा सातत्याने घटत असून सध्या एकूण साठा सुमारे ३२ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा केवळ ३० टक्के राहिल्याने शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आगामी पावसाकडे लागले आहे..गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्याला होतो. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव आणि जळगाव तालुक्यांतील अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी या धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तसेच रब्बी हंगामात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्राला या धरणाचा लाभ मिळतो..Dam Water Level Drop: खानदेशातील जलसाठ्यात झपाट्याने घट.यंदा टंचाई निवारणासाठी गिरणा धरणातून तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. रब्बी हंगामासाठीही तीन आवर्तने देण्यात आली होती. परिणामी धरणातील साठ्यात आणखी घट झाली आहे. मागील चार वर्षांत हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र २०२३ च्या पावसाळ्यात धरणातील साठा केवळ ५६ टक्के राहिल्याने रब्बी हंगामाला अपेक्षित लाभ मिळाला नव्हता..Koyna Dam Water Level: कोयना धरणाने गाठला तळ.सध्या पावसाअभावी आणि वाढत्या उष्णतेमुळे गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे पुढील काळात समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, तापी नदीवरील हतनूर धरणातील जलसाठाही कमी होत आहे. यंदा जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. .धरणात सुमारे ५४ टक्के गाळ असल्याने उपयुक्त जलसाठा मर्यादित राहतो. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, वरणगाव आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव औद्योगिक वसाहत आणि नदीकाठच्या गावांसाठी या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जामनेर तालुक्यातील वाघूर धरणात सध्या सुमारे ३८ टक्के जलसाठा आहे. जामनेर व जळगाव शहरांसह औद्योगिक वापरासाठी येथून पाणी दिले जात असल्याने साठ्यात घट होत आहे..याशिवाय जळगाव जिल्ह्यातील बहुळा, अंजनी, मन्याड, तोंडापूर, अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर आणि गूळ या धरणांमधील एकत्रित जलसाठा ३४ टक्क्यांपेक्षा कमी आहे. धुळे जिल्ह्यातील अनेर, पांझरा, अमरावती, सोनवद आणि बुराई प्रकल्पांतील साठा सुमारे ३१ टक्के असल्याची माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.