Jalgaon News : खानदेशात कमाल भागात १०० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. पावसाचा धुमाकूळ मध्यंतरी झाला. काही दिवसांपासून पाऊस बंद आहे. पण वाफसा नाही. काढणी, मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे. .यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच काही भागांत पावसाने एकूण सरासरीची टक्केवारी ओलांडली आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये अनेक महसूल मंडले, तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाऊस १०२ टक्के एवढा आहे. .Washim Rainfall : वाशीम जिल्ह्यावर यंदा अति पर्जन्यकृपा.जळगावचे एकूण पाऊसमान ६३२ मिमी, धुळ्याचे ५६४ मिमी तर नंदुरबारचे पाऊसमान ८५४ मिमी एवढे आहे. या सर्व जिल्ह्यांत अनेक तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जळगाव जिल्ह्यात एरंडोल, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, पाचोरा येथे १०० टक्के पाऊस झाला आहे. तर या महिन्यात काही दिवस पावसाची उघडीप आहे..मागील तीन दिवसांपासून अनेक भागात पाऊस नाही. तीन-चार दिवसांपासून खानदेशात सकाळपासून ऊन आहे. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर आदी भागांत कोरडे वातावरण आहे. सायंकाळी काही भागांत ढगाळ, पावसाळी वातावरण तयार होते. उकाडा मात्र वाढला आहे. .धुळ्यातही शिरपूर, धुळे तालुक्यांतील अनेक भागांत सध्या नीरभ्र वातावरण आहे. पण काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाही. जळगाव जिल्ह्यात चोपडा व यावल भागांत सरासरीपेक्षा कमी कमी पाऊस आहे. धुळ्यात शिंदखेडा व नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा भागांतील काही मंडलांत कमी पाऊस आहे..पीकविमा कंपनीकडून अपेक्षाच नाहीतउडीद, सोयाबीनचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रारी नोंदवूनही यंदा पुढील कार्यवाही होणार नाही. कारण योजनेत बदल केले असून, उंबरठा उत्पादन हा निकष आहे. त्यात मागील १० वर्षांतील उत्पादनाशी यंदाचे उत्पादन, सरासरी जुळते का हे लक्षात घेतले जाईल. पीक कापणी प्रयोग त्यासाठी केले जातील. .Satpuda Rainfall : यावल तालुक्यातील हरिपुरा, वड्री प्रकल्प तुडुंब.यंदा पीकविमा कंपनीकडे तक्रारी दाखल करून पंचनामे करण्याची सुविधा नाही. यामुळे विमाधारक शेतकरी उंबरठा उत्पादन, पीक कापणी प्रयोग यात काय समोर येते याकडे लक्ष ठेवून आहेत. काही शेतकऱ्यांनी पावसात हानीच्या तक्रारी शासनाकडे किंवा नजीकच्या प्रशासनाकडे केल्या आहेत. पण त्यानंतरही शासनाने नुकसानीची दखल घेतलेली नाही, अशी माहिती मिळाली..काढणीवर आलेल्या पिकांची हानीसध्या खानदेशात उडीद पीक काढणीवर आहे. पण वाफसा नसल्याने त्यात कापणी, मळणीचे काम होऊ शकत नाही. मका, सोयाबीन या पिकांची काढणी, मळणी सुरू होईल, अशी स्थिती आहे. परंतु पावसामुळे या पिकांची मळणी लांबू शकते. त्यात पुढे पाऊस आल्यास अडचणी वाढतील. पूर्वहंगामी कापूस पिकातही बोंडे उमलतील, अशी स्थिती आहे. पण त्यासाठी नीरभ्र वातावरण हवे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.