Nationalised Banks Issue: खानदेशात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरण सुरू आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज वितरणाबाबत हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, जिल्हा बँकांनी पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली असून, कर्जवाटपाची प्रक्रिया गतीने सुरू ठेवली आहे..धुळे-नंदुरबार जिल्हा बँक आणि जळगाव जिल्हा बँकेने खरीप पीक कर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित झाल्यानंतर प्रस्ताव वेगाने स्वीकारून कर्जवाटप सुरू केले. या दोन्ही बँकांनी लक्ष्याच्या तुलनेत पीक कर्ज वितरणाला सुरुवातीपासूनच गती दिली आहे. जळगाव जिल्हा बँकेला यंदा सप्टेंबर २०२६ पर्यंत सुमारे १ हजार ५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करायचे आहे. तर धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २४३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे..Crop Loan Distribution: पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता.खानदेशात राष्ट्रीयीकृत बँकांकडून मात्र पीक कर्ज वितरण संथ गतीने सुरू आहे. रब्बी हंगामातही या बँकांकडून केवळ ७४ टक्के पीक कर्ज वितरण झाले होते. आता खरीप हंगामातही कर्जवाटपाची गती संथ राहिल्यास प्रशासनाने निश्चित केलेल्या लक्ष्याइतके पीक कर्ज वितरित होणार नाही, अशी स्थिती आहे..जळगाव जिल्ह्यात एकूण सुमारे २ हजार ४०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण अपेक्षित आहे. तर धुळे-नंदुरबार जिल्ह्यांत मिळून सुमारे १ हजार ५०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण अपेक्षित आहे. नंदुरबारात स्टेट बँक ऑफ इंडिया, तर जळगावात सेंट्रल बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांकडून अद्याप ६५ टक्केही पीक कर्ज वितरण झालेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे..Bank Crop Loan Delay: पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका मागे.अनेक शेतकऱ्यांचे नवीन पीक कर्जाचे प्रस्ताव बँकांकडे प्रलंबित आहेत. त्यावर प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नवीन कर्ज प्रस्तावासाठी जमिनीचे मूल्यपत्र मागितले जात आहे. तसेच सर्च रिपोर्ट आणि अन्य कागदपत्रांचीही मागणी बँकांकडून केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, १५ ते २० दिवस वणवण फिरून ही कागदपत्रे मिळवावी लागत आहेत. त्यानंतर बँका पीक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारत आहेत..यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, पीक कर्ज देताना बँकांनी केवळ सात-बारा उतारा, आठ-अ उतारा आणि अलीकडील दोन वर्षांतील फेरफार नोंदी एवढीच कागदपत्रे मागावीत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे..सिबिल स्कोअर व रिपोर्टची तपासणीकाही खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका सिबिल स्कोअरची अट घालून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँका पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट तपासत आहेत. सिबिल रिपोर्टमध्ये संबंधित शेतकऱ्याने अन्य बँकांकडून पीक कर्ज घेतले आहे का, तसेच फेरफार नोंदी आणि अन्य कर्जविषयक माहिती तपासली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.