Agriculture Banking Issue: खानदेशात पीककर्ज वितरण ७५ टक्केही झालेले नाही. सुमारे चार हजार कोटी रुपये पीक कर्ज खरिपात वितरित करायचे आहे. खरीप हंगाम अधिकृतपणे जूनमध्ये सुरू झाला. जुलै महिना संपला तरीदेखील पीककर्ज वितरणाची गती कमी दिसत आहे. .राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वाटपात हात आखडता घेत आहेत. शेतकरी नव्या पीक कर्जाचे प्रस्ताव घेऊन बँकेत जात आहेत. परंतु बँका शेतकऱ्यांना शाखेत प्रतिसाद देत नाहीत. तांत्रिक अडचणी व अन्य कारण सांगितले जाते. अनेक शाखांमध्ये पीक कर्ज प्रस्तावांबाबत आढावा घेतला जात नाही. जिल्हा प्रशासनही याकडे आढावा घेऊन बँकांना आदेश देत नाही. यामुळे पीककर्ज प्रस्तावावर निर्णय होत नाही..Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ.जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी, धुळ्यात ५०० आणि नंदुरबारात ७०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. गेल्या वर्षीदेखील पीककर्ज फक्त ८० टक्केच वितरित झाले होते. शासन किंवा प्रशासन पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्चित करते, परंतु बँकांना पीककर्ज निधीची व्यवस्था करावी लागते. शेती कर्ज, पीककर्ज हे जोखीमेचे आहे. यामुळे हे कर्ज देताना बँका हात आखडता घेत असल्याचा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत. यामुळे प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करावी, योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ.जिल्हा बँकांची आघाडीजळगाव जिल्ह्यात सुमारे १८०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. धुळे व नंदुरबारातही प्रत्येकी ४०० कोटींवर पीक कर्ज वितरण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज वाटपात आघाडीवर आहे. पीक कर्ज वितरण या बँकेने एप्रिलमध्ये सुरू केले..जिल्हा बँकेने सुमारे एक हजार कोटी रुपये पीक कर्ज वितरण केले आहे. धुळे जिल्हा बँकेनेही सुमारे २५५ कोटी रुपये पीक कर्ज दिले आहे. धुळे जिल्हा बँक धुळे व नंदुरबारात पीक कर्ज देते. दोन्ही जिल्ह्यात या बँकेच्या शाखा व सभासद, संचालक आहेत. पण राष्ट्रीयीकृत बँका पीक कर्ज देताना एक महिना ते २५ दिवस शेतकऱ्यांना वणवण फिरायला लावतात, अशीही नाराजी व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.