Farmers Waiting for Compensation: खानदेशात जानेवारी २०२६ मध्ये २७ जानेवारी रोजी आणि नंतर ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल २०२६ रोजी वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला आहे. यात सुमारे २८ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पण भरपाई अजूनही मिळालेली नाही. .खानदेशात दरवर्षी केळी पिकाचे अधिकचे नुकसान वादळी पावसात होत आहे. पण तोकडा निधी किंवा भरपाई दिली जाते. त्यात यंदा वर्षाच्या पहिल्या व तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात वादळी पाऊस, गारपिटीने हानी झाली आहे. पंचनामे करण्यात आले. पण पहिल्या नुकसानीसंबंधीदेखील भरपाईची यादी तहसीलदार कार्यालयात आलेली नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत..Crop Damage Compensation: मार्चमधील नुकसानीपोटी २५ कोटी भरपाईचा प्रस्ताव.धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारातील शहादा, जळगावातील चोपडा, यावल, जळगाव परिसरात जानेवारीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. पपई आणि केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, भरपाई मिळालेली नाही..जानेवारीमधील वादळी पाऊस व गारपिटीत सुमारे ११ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती. त्यानंतर ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल रोजी खानदेशात पुन्हा गारपीट, वादळी पाऊस झाला. मार्च व एपिलमध्ये सलग चार दिवस विविध भागांत वादळी पाऊ, गारपीट झाली. यात जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टरवरील केळीची हानी झाली. तसेच अन्य पिकांनाही फटका बसला. .Crop Damage Compensation Delay: शिरूरमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत.केळीसह मका, गहू, बाजरी, पपई, कलिंगड, भाजीपाला पिकांची हानी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे वित्तीय नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, भरपाईची मागणी केली जात आहे. आता आणखी तापमानात वाढ झाली आहे. उकडा व ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे पाऊस पुन्हा येईल की काय, भिती आहे..वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला. अस्मानी संकटामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.युवराज पाटील, शेतकरी, चोपडा, जि.जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.