Cotton Picking: खानदेशात दसरा सण तोंडावर असतानाच कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मजुरीदर स्थिर असून, मजूरटंचाई मात्र कायम आहे. यात वेचणी करून घेण्याची लगबग शेतकरी करीत आहेत. .कापसाचे दर यंदाही स्थिर आहेत. यामुळे शेतकऱ्यांत बागायतदार कापूस उत्पादकांना दिलासा मिळत आहे. मागील हंगामात दर कमी होते. मागील वेळेस सरासरी साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला..Cotton Harvesting : खानदेशात पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू.यात कापूस दर वधारताच मजुरी दर २०२१ मध्ये दुप्पट झाले. ते मजुरी दर तसेच आहेत. कारण २०२१ मध्ये काही किंवा मोजक्या शेतकऱ्यांना आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. यातच कापसाला चांगले दर असल्याचे हेरत २०२१ मध्ये मजुरांनी दरांसाठी शेतकऱ्यांची कोंडी केली व मजुरी दर वाढवून घेतले..Cotton Harvesting: कापूस वेचणी दर १५ ते १८ रुपये.कापूस वेचणीसाठी सध्या किमान पाच रुपये प्रति किलोचे दर आहेत. तर जेथे कमी कापूस वेचणीला आला आहे किंवा बोंडे कमी उमलली आहेत, तेथे मजूर १८० ते २०० रुपये रोज, अशी मजुरी घेत आहेत. सकाळी आठ ते दुपारी अडीच या कालावधीत कापूस वेचणीसाठी ही मजुरी आहे. खानदेशात विविध तालुके, क्षेत्रनिहाय मजुरी दर वेगवेगळे आहेत. तसेच उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे मजुरांची परवड होत आहे..अन्य भागातून मजूर आणण्याची धावपळमजूर टंचाई मात्र कायम आहे. गावात मजूर संख्या कमी आहे. यामुळे अनेक कापूस उत्पादक नजीकच्या मोठ्या गावांतून मजूर आणत आहेत. यात मजुरांची वाहनातून ने आण करावी लागते. यासाठीचे वाहतूक भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. एकाच वेळी अनेक बागायतदार किंवा पूर्वहंगामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीवर आला आहे. यात दसरा व लागलीच दिवाळी सण आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.