Maharashtra Cotton Farmers Update: खरिपात खानदेशात कापूस हे प्रमुख पीक असून, पावसाचा ताण आणि त्यानंतर उद्भवलेल्या अन्य समस्यांमुळे पिकाची वाताहत झाली. आता बाजारात कापसाचे दरही कमी होत आहेत. रोगराईमुळे उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दर्जा, ओलावा आदी कारणे सांगून खेडा खरेदीत कापसाला कमी दर दिले जात आहेत. कापसाला चार ते पाच प्रकारचे दर मिळत आहेत. दुसरीकडे मजुरीचे दर वाढले असून, उत्पादन खर्चही अधिक आहे. त्यामुळे वाढता उत्पादन खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत..कापसाची सर्वाधिक लागवड खानदेशात केली जाते. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कापूस लागवडीत खानदेश आघाडीवर आहे. यात पूर्वहंगामी कापसाचीदेखील पावणेदोन लाख हेक्टरमध्ये खानदेशात लागवड झाली आहे. ही लागवड मे अखेरिस व जूनच्या सुरवातीला झाली. तर एकूण कापूस पीक खानदेशात सुमारे सात लाख हेक्टरवर आहे..India Cotton Production: देशात कापूस उत्पादन १४ टक्के घटणार.यंदा लागवड सुमारे ७० ते ८० हजार हेक्टरने कमी झाली. पण अन्य पिकांच्या तुलनेत कापूस लागवड अधिकच आहे. खरिपातील एकूण लागवड खानदेशात सुमारे १४ लाख हेक्टरवर झाली आहे. यंदा पाऊस वेळेत न आल्याने पेरा कमी झाला होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार लाख ४५ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्टरवर कापूस पीक होते..कापूस लागवडीत मागील हंगामाच्या तुलनेत घट झाली आहे. पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे उमलण्यात सुरवात झाली. ऊनही मध्यंतरी तापले. आता दर्जेदार शेतमाल हाती येत आहे. पण दर कमी होत आहेत. त्यात यंदा पावसाचा खंड होता. यात कापूस पिकाचे नुकसान झाले. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये काही भागात अत्यल्प पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, बोदवड, पारोळा या प्रमुख कापूस उत्पादक तालुक्यांत कापसाचे नुकसान अधिक झाले..Cotton Production: कापसाचे हेक्टरी उत्पादन साडेचार क्विंटलपर्यंत.कमी पावसात हानी मोठीखानदेशात कमी पावसाने सुमारे पाच लाख हेक्टरवरील कापसाची हानी झाली आहे. पंचनामे झाले आहेत. अनेक भागात कापूस पीक लाल -पिवळे झाले आहे. त्याची वाढ थांबली आहे. कोरडवाहू कापूस पिकात काहीही हाती येणार नाही, अशी स्थिती आहे..काळ्या कसदार जमिनीत स्थिती बरीकाळी कसदार जमीन पाण्याचा निचरा फारसा करीत नाही. यात कमी पाऊस असल्याने या जमिनींत कापूस पीक तग धरून होते. कमी पावसात या जमिनीत पूर्वहंगामी कापूस पीक बऱ्यापैकी आले आहे. मध्यंतरी नीरभ्र वातावरण होते. आता पुन्हा ढगाळ वातावरण आहे. यामुळे पिकात रोगराई दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.