Khandesh Cotton Farmers Production Report: खानदेशात यंदा कापूस प्रक्रिया उद्योग सुरुवातीपासून संथ असल्याने कापूसगाठींची निर्मिती १८ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) इतकी झाली. ती प्रत्यक्षात २२ ते २३ लाख गाठी इतकी होईल, अशी अपेक्षा होती. कमी आणि विस्कळीत झालेला कापूस पुरवठा हे मागील प्रमुख कारण सांगितले जात आहे..कापसाची आवक डिसेंबरमध्ये वाढली. या काळात खानदेशात रोज २२ ते २५ हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया केली जात होती. कापसाचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असतो. या १२ महिन्यांच्या कालावधीत खानदेशात २२ ते २३ लाख कापूसगाठी तयार होतील, अशी अपेक्षा होती..Cotton Production: कापूस उत्पादनवाढीसाठी शिफारशीत तंत्रज्ञान वापरा.परंतु प्रक्रिया उद्योग हवा तसा कार्यरत नव्हता. १५० पैकी फक्त ११२ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू होते. अन्य कारखाने वित्तीय संकटे, कर्ज यामुळे सुरू झाले नाहीत. तसेच दिवाळीनंतर मजूरटंचाईदेखील होती. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत खानदेशात प्रति दिन सरासरी २२ हजार क्विंटल कापसाचा पुरवठा झाला..यावर प्रक्रियाही सुरू होती. परंतु मार्चमध्ये आवक घटली. कारण कमाल शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. स्थानिक क्षेत्रात कापसाची आवक अत्यल्प आहे. यामुळे अनेक कारखाने लवकरच बंद होतील, अशी स्थिती आहे..Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.काही कारखान्यांचे कामकाज जोमातकाही वित्तीय स्थिती चांगले असलेले कारखाने राज्यातून किंवा अन्य भागातून कापसाचा रोज पुरवठा करून घेत आहेत. खानदेशातील कारखान्यांत २५ लाख कापूसगाठींपेक्षा अधिकची रूई निर्मितीची क्षमता आहे..परंतु कापसाचा कमी पुरवठा, बंद होत असलेले कारखाने यामुळे अपेक्षित कापूस प्रक्रिया होत नसल्याची स्थिती आहे. २०११ ते २०१४ या कालावधीपर्यंत खानदेशात दर वर्षी किमान २२ ते २३ लाख कापूसगाठींची निर्मिती झाली आहे. परंतु २०१४ नंतर कापूस गाठींची अपेक्षित निर्मिती होऊ शकलेली नसल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.