Jalgaon News: खानदेशात यंदा दर महिन्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. थंडी हवी तशी नव्हती. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ढगाळ वातावरण कायम असून, रब्बी, उन्हाळ पिकांच्या उत्पादनवाढीसही यामुळे फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्येही अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. जानेवारीअखेरीस गारपीट व पाऊस झाला होता. आता काही दिवसांपूर्वी अंशतः ढगाळ वातावरण होते. परंतु हे वातावरण निवळले. पावसाचा अंदाज काही संस्था, तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे..Cloudy Weather Impact: बाजरीला ढगाळ वातावरणाचा फटका.सध्या किमान तापमान खानदेशात 18 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. मध्यंतरी अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले होत. यामुळे उष्णता काहीशी कमी झाली आहे. यामुळे केळी, भाजीपाला पिकांत बुरशीजन्य रोगांची समस्या पसरण्याची भिती होती. अशात शेतकऱ्यांनी फवारण्या घेतल्या..हरभरा, दादर ज्वारी आदी पिकांची मळणी सुरू आहे. सध्या निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज रब्बी पिकांना आहे. परंतु पावसाळी वातावरण तयार झाल्यास आणखी अडचणी येतील. सध्या कलिंगड, खरबूज, केळी, पपई पिकात काढणी सुरू आहे. केळी लागवडदेखील खानदेशात सुरू आहे. काढणी, खरेदीची कार्यवाही शिवारात होत असल्याने त्यासाठी कोरड्या व निरभ्र वातावरणाची गरज आहे..Foggy Weather: ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर.खरेदीदारांकडून गैरफायदापावसाळी, ढगाळ वातावरणामुळे खरेदीदार खरेदी, काढणीची प्रक्रिया लांबणीवर टाकतात. यामुळे शेतकऱ्यांना काढणीची प्रतीक्षा करावी लागते. खराब रस्ते, अडचणीच्या भागातील रस्त्यांलगतच्या शेतकऱ्यांनी मात्र केळी, पपई काढणीवर भर दिला आहे. कारण या भागात पाऊसदेखील झाल्यास वाहने शेतापर्यंत पोचत नाहीत..यामुळे काही शेतकऱ्यांना कमी पक्व शेतमालही काढणी करून खरेदीदारांना द्यावा लागत आहे. कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची कापणी सुरू आहे. केळी, भाजीपाला पिकांचे सिंचन उष्णता वाढल्याने सुरू आहे. अशात पाऊस आल्यास हे नियोजन कोलमडेल, अशी स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.