Banana Farmers Issue: खानदेशात केळीचे दर स्थिर असतानाच यावल, रावेर आणि चोपडा भागातील मुख्य रस्त्यांलगतच्या केळी बागांमधून केळी चोरीचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात विविध पोलिस ठाण्यांत दहापेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र चोरट्यांचा शोध लागत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत..मध्यंतरी डांभुर्णी (ता. यावल) येथेही केळी चोरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पीक संरक्षण सहकारी संस्थेने पुढाकार घेऊन संबंधितांना पकडून कारवाई केल्याचे सांगण्यात आले. मागील काही दिवसांपासून केळीचे दर स्थिर आहेत. त्यातच बागांमधून केळी चोरीचे प्रकार घडत असल्याने उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे..Goat Theft: शेळ्या, बोकड चोरणाऱ्या चौघांना पकडले.कृषिसाहित्याच्या चोऱ्यांचे सत्रखानदेशातील विविध भागांत कृषिपंपांच्या केबल, ठिबक संच, पाइप तसेच शेतातील अन्य साहित्याच्या चोरीचे प्रकार सुरूच आहेत. मागील दोन-तीन हंगामांपासून हे प्रकार सातत्याने घडत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे..Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला.तापी नदीकाठासह नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर; धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री; तसेच जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर आणि पारोळा भागांत ठिबक संच, पाइप, लोखंडी साहित्य, कृषिपंपांचे स्विच आणि तांब्याच्या केबल चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी आहेत..मागील काही दिवसांत चोपडा तालुक्यातील तापी आणि अनेर नदीकाठच्या शिवारात केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी चोरट्यांनी फ्यूजपेट्या आणि अन्य साहित्याची तोडफोड केल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने मध्यरात्री हे प्रकार घडत आहेत. केळी, पपई आणि भाजीपाला पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी तसेच फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते. .त्यासाठी कृषिपंप सुरू करावे लागतात. मात्र केबल चोरीला गेल्यानंतर कृषिपंप बंद राहत असल्याने पिकांच्या व्यवस्थापनावरही परिणाम होत आहे. केबल चोरीला गेल्यानंतर नवीन केबल खरेदी करण्यासह कूपनलिकेतील कृषिपंप काढणे व पुन्हा बसविण्यासाठी खर्च करावा लागतो. या कामासाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. साहित्याची तोडफोड झाल्यास हा खर्च आणखी वाढतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.