Fruit Market: खानदेशात केळी आवकेत मागील सात ते आठ दिवसांत सुमारे २५ ते ३० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी वाढ झाली आहे. केळीस उठाव असून, दर किमान प्रति क्विंटल १२०० व कमाल २१०० रुपयांपर्यंत आहेत. उत्तर भारतात खानदेशी केळीस मोठा उठाव आहे. .मागील हंगामातही आंबा ज्या वेळेस दाखल झाला, त्या वेळेस केळीदर स्थिरावले होते. यंदाही आंब्याच्या हंगामात केळी दर वधारले आहेत. आंब्याची आवक कमी असतानाच स्थानिक व देशातील बाजारांत केळीस मागणी वाढली आहे. मध्य प्रदेशात आगाप कांदेबाग केळी पीक अधिक आहे. .Banana Price: अकोल्यात आठवड्याभरात केळी दरात ५०० रुपयांची वाढ.गुजरातमधील राजपिपला, बडोदा, आणंद व नर्मदा नदीच्या क्षेत्रातील केळी पीक यंदा कमी आहे. तेथून उत्तर भारतात हवा तेवढा केळी पुरवठा नाही. आंध्र प्रदेशात केळी हंगाम आटोपल्यात जमा आहे. राज्यात सोलापूर व तेथून नजीक असलेल्या क्षेत्रातून केळी निर्यात आखातात सुरू आहे. सोलापुरातून रोज ३५ ते ४० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात होत आहे..Banana Price: केळीचे दर पोहोचले नीचांकी पातळीवर.खानदेशातूनही रोज १२ ते १३ कंटेनर केळी निर्यात होत आहे. यामुळे बाजारात पोकळी तयार होत असून, याचा लाभ केळी उत्पादकांना होत आहे. १५ ते १८ दिवसांपूर्वी केळी दर खानदेशात २००, ३०० ते ९०० व ११०० रुपये प्रति क्विंटल असे होते. पण मागील १४ ते १५ दिवसांत केळी दरात सुधारणा झाली व दर टिकून आहेत..आवकेत वाढखानदेशात केळीची आवक सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा व तळोदा भागांत होत आहे. अन्य भागांत अल्प आवक आहे. सध्या खानदेशात रोज ३१५ ते ३२० ट्रक केळी आवक होत आहे. आवकेत २५ ते ३० ट्रक एवढी वाढ दिसत आहे. सर्वाधिक आवक रावेर व यावल भागांत आहे. मागील वर्षी जून व जुलै महिन्यात लागवड केलेल्या मृग बहर केळी बागांतून ही काढणी सुरू आहे. काढणीस गती आली आहे. रावेर व यावल भागांत रोज २३० ते २४० ट्रक केळी आवक आहे. मागील हंगामातही खानदेशात मे महिन्याच्या सुरुवातीला प्रति दिन ३२५ ट्रक एवढी केळी आवक होती. पण केळीस उठाव असल्याने दर टिकून आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.