Maharashtra Agriculture : जळगाव जिल्ह्यात मार्च ते जूनदरम्यान झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळीसह विविध फळबागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण होऊनही भरपाईबाबत शासन किंवा विमा कंपनीकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सुमारे २,२०० विमा दावे बेदखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने केळी उत्पादकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे..जळगाव, यावल, चोपडा, रावेर आणि मुक्ताईनगर परिसरात वादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. मात्र काही भागांत हवामान केंद्राकडे वादळ किंवा जोरदार वाऱ्यांची अधिकृत नोंद नसल्याने संबंधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी विमा कंपनीच्या कारभाराबाबत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला आहे..Crop Insurance Scheme: कुचकामी विमा योजना शेतकऱ्यांच्या माथी.हवामान नोंदींचा अडथळायंदाही अनेक भागांत प्रत्यक्षात वादळामुळे मोठे नुकसान झाले असले, तरी हवामान केंद्राकडे त्याची अधिकृत नोंद नसल्याने विमा दाव्यांच्या निकालाबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे..गिरणाकाठचे शेतकरीही नाराजपाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव आणि भडगाव तालुक्यांतही मार्च ते जूनदरम्यान वादळामुळे केळी, इतर फळबागा, भाजीपाला आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे होऊनही भरपाईबाबत ठोस निर्णय न झाल्याने गिरणाकाठ परिसरातील शेतकऱ्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे..Banana Crop Insurance Claims: केळी विमाधारकांच्या प्रस्तावांचा गोंधळ कायम.एक लाख शेतकरी विमाधारकयंदा जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांनी फळ पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला असून, त्यामध्ये केळी उत्पादकांचा मोठा वाटा आहे. या योजनेत नुकसानाच्या प्रमाणानुसार प्रति हेक्टर कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद आहे..यापूर्वी २०२३-२४ मध्ये सुमारे ५२ हजार, तर २०२४-२५ मध्ये ७२ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विमा उतरविला होता. मात्र मागील हंगामातही वादळामुळे ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊनही भरपाई उशिराने मिळाली किंवा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.