Climate Impact: खानदेशात मागील महिना आणि या महिन्यात सलग तीन दिवस विविध भागांत वादळी पाऊस, गारपीट झाली. यात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामे केले असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टरवरील केळी बागांची हानी झाली आहे. वादळी पाऊस, गारपिटीनंतर आता उष्णतेचा फटका केळीसह अन्य पिकांना बसत आहे. .खानदेशात ३० आणि ३१ मार्च आणि १ आणि २ एप्रिल रोजी अनेक भागांत गारपीट, वादळी पाऊस झाला आहे. यात केळीची हानी जळगाव, रावेर, यावल आदी तालुक्यांत झाली असून सुमारे ११ हजार हेक्टरला मोठा फटका बसला आहे. तसेच अन्य भागांतही नुकसान झाले आहे. सुमारे १०० पेक्षा अधिक केळी उत्पादकांचे यामध्ये नुकसान झाले आहे..Banana Crop Damage: वादळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान.जळगावातील भोकर, भादली खुर्द, पिलखेडा, गाढोदे, फुपनगरी, फुपणी आदी भागांत केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. यात केळीला वादळाचा अधिकचा फटका बसला आहे. सलग तीन दिवस वादळी पाऊस आल्याने लहान केळीबागांची पाने फाटून नुकसान पातळी ५० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. मोठ्या बागा किंवा काढणीवरील बागा भुईसपाट झाल्या आहेत..Banana Crop Damage: केळीच्या नुकसानीचे परतावे अप्राप्त.उष्णतेचा दणकादुसरीकडे उष्णताही अधिक आहे. रोज ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान आहे. या स्थितीत केळी बागांची वाढ खंटते. विमा कंपनीने पात्र केळी विमाधारकांना यासंबंधी परताव्यांबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. वादळी पाऊस झाला पण महसूल प्रशासन, कृषी सहायक अनेक भागात पोचलेलेच नसल्याच्या तक्रारीदेखील आहे. .महसूल प्रशासनाने नुकसानीची टक्केवारी कमी आहे, आम्हाला आदेश नाहीत, असे सांगून ढकलाढकल केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, या बाबत योग्य ती कार्यवाही करावी, प्रशासनातील वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.