Jalgaon News: खानदेशात जानेवारी महिन्यात पाऊस आणि ढगाळ वातावरण तब्बल १८ दिवस राहिले आहे. अद्यापही अंशतः ढगाळ वातावरण आहे. दुपारी उकाडा व सकाळी गारठा, अशी स्थिती असते. याचा वेलवर्गीय पिकांसह केळीसही फटका बसला आहे.गेल्या दोन महिन्यांत फक्त १५ ते २० दिवस निरभ्र, कोरडे वातावरण राहिले. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या महिन्यातही ढगाळ वातावरण राहिले आहे. दुपारी उकाडा असतो. सायंकाळनंतर गारठा असतो..Cloudy Weather Maharashtra: ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतातुर.नोव्हेंबरच्या मध्यात निरभ्र वातावरण होते. डिसेंबरमध्ये थंडी चांगली होती. जानेवारीच्या अखेरच्या दहा दिवसांत पावसाळी वातावरण तयार झाले आहे. २७ जानेवारी रोजी धुळे, जळगावातील अनेक भागांत वादळी पाऊस, गारपिट झाली. यानंतरही अंशतः ढगाळ वातावरण राहिले आहे..Cloudy weather: खानदेशात ढगाळ वातावरण; शेतकऱ्यांकडून पिकांतील सिंचन बंद.पाऊस, थंडी आणि उकाडानोव्हेंबरमध्ये खानदेशात सुरुवातीला पाऊस झाला. नंतर थंडी वाढली. थंडी अनेक दिवस राहिली. नंतर ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. थंडी कमी झाली. याचाही फटका कलिंगड, टोमॅटो आदी पिकांना बसला आहे. उशिराचा हरभरा व अन्य पिकांतही नुकसान झाले. बुरशीनाशकांच्या फवारण्या घ्याव्या लागल्या. २७ जानेवारी रोजी झालेल्या पावसानंतर थंडीचे आगमन झाले नाही..पावसाळी वातावरणामुळे कापसाची खेडा खरेदीदेखील मध्यंतरी रखडत सुरू होती. कारण ही खरेदी उघड्यावर केली जाते. कापूस ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जाते. यासाठी कोरडे वातावरण हवे असते. कांदा पीक, रोपांचे अंशतः नुकसान ढगाळ वातावरणात झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची केळी, पपई काढणीवर आहे. पिके विषम वातावरणामुळे संकटात आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.