Groundwater Recharge : सांगली दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वन विभागाने श्रमदानातून जलसंधारणाची मोहीम हाती घेतली आहे. खानापूर तालुक्यात २८ वनराई बंधारे बांधण्यात आले असून, वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणीस्रोतांवर २२५ वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले असल्याची माहिती खानापूर-विटा वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी दिली..पवळे म्हणाले, की खानापूर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, भूजल पातळीतील घट, जलस्रोतांमधील अपुरा पाणीसाठा झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. भूजल पुनर्भरणाची क्षमता घटल्यानेही परिस्थिती गंभीर झाली आहे. .Water Distribution : पाणीवाटपाचे प्रश्न जागेवरच सोडवा.संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या शासनाच्या सूचनांनुसार, तालुक्यातील वनक्षेत्रात साखळी पद्धतीने ठराविक अंतरावर वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. तालुक्यातील वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणीस्रोतांवर वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. .Seed Distribution: केव्हिकेतर्फे शाळा, अंगणवाड्या, महिला शेतकऱ्यांना रोपे, बियाणे वाटप.वनपाल, वनरक्षक, वनमजूर, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या श्रमदानाने हे बंधारे उभारले जात आहेत. सुळेवाडी, पारे, घोटी बुद्रुक, खंबाळे, भिकवडी बुद्रुक, वाळूज, रेवणगाव, वासुंबे, धोंडगेवाडी, मादळमुठी, देविखिंडी, लेंगरे, जाधववाडी, करंजे, पोसेवाडी, घोटी खुर्द, ऐनवाडी, मेंगाणवाडी, हिवरे, ताडाचीवाडी आणि बाणूरगड येथील वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणीस्रोतांवर वनराई बंधारे बांधण्यात येणार असून हे काम श्रमदानातून पूर्ण केले जाईल. .जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार, उपवनसंरक्षक (प्रा.) सागर गवते आणि सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असल्याचे पवळे यांनी सांगितले. जलसंधारणाच्या या सामूहिक उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.