Farmer Training Maharashtra : खांबेगाव (ता. पूर्णा) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कपाशी पीक व्यवस्थापनावर शुक्रवारी (ता. ७) चौथ्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी कपाशीची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानासह एकात्मिक कीड, रोग आणि खत व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले..‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, उपसंचालक अभिषेक घोडके, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ अमित तुपे, मंडळ कृषी अधिकारी बालाजी घाडगे, उपकृषी अधिकारी किरण सातपुते, कृषी अधिकारी अच्युत तळणीकर, स्वप्नील शिंदे, ‘आत्मा’च्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके, रमेश इक्कर, अभिजित देशमुख, सुरेश शृंगारपुतळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..Agricultural Technology: कृषी तंत्रज्ञान विकासासाठी आंतरविद्याशाखीय गटकार्याची गरज.अमित तुपे यांनी कापूस उत्पादकता वाढीसाठी ‘दादा लाड’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कपाशीच्या झाडावरील गळफांद्या कापणे आणि शेंडा खुडण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. तसेच एकात्मिक कीड, रोग आणि खत व्यवस्थापनावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली..Smart Farming: ‘स्मार्ट फार्मिंग’ हाच शाश्वत प्रगतीचा मार्ग.दौलत चव्हाण यांनी कापूस पिकासाठी पीक विमा योजनेचे महत्त्व आणि विम्याचा लाभ घेताना आवश्यक बाबींची माहिती दिली. कापूस पिकावरील विविध किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. किडींचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नियमित निरीक्षण करून योग्य वेळी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले..शेतीशाळेच्या माध्यमातून कापूस उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी आवश्यक सुधारित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.