Nagpur News : काटोल बाजार समितीने शेतकरी संकुलाची अभिनव संकल्पना मांडली आहे. अडीच एकरावर हे संकुल साकारले जाणार असून २७.५० कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती सचिव पराग दाते यांनी दिली. .आमदार चरणसिंह ठाकूर हे बाजार समितीचे सभापती आहेत. त्याच्या नेतृत्वात शेतकरी हिताच्या प्रकल्पांवर बाजार समितीने भर दिला आहे. त्या अंतर्गत अभिनव अशा शेतकरी संकुलाचा प्रस्ताव पणन मंडळाला देण्यात आला आहे. .Katol APMC : उच्च न्यायालयाची पणनमंत्र्यांना नोटीस.राज्यात अशाप्रकारचा हा एकमेव प्रकल्प असेल, असा दावा केला जात आहे. सध्या भाजी बाजार भरणाऱ्या अडीच एकरावर तो साकारला जाणार आहे. भाजी बाजाराच्या परिसरात दोन गोदाम असल्याने हा परिसर भाजी बाजाराकरिता कमी पडतो. .Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय.त्यामुळे त्याचे स्थलांतर धान्य बाजाराच्या परिसरात केली जाईल. त्यानंतर भाजी बाजार परिसरातील शेतकरी भवन प्रकल्पात शेतीमालाच्या साठवणुकीकरिता शीतगृह (कोल्डस्टोरेज) त्याच्या जोडीला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह इतर विविध सयंत्र तसेच बि-बियाणे याची खरेदीची सोय राहणार आहे. त्याकरिता कंपन्यांसमवेत सामंजस्य करारही करण्यात आल्याची माहिती श्री. दाते यांनी दिली..बाजार समितीचे क्लिनिंग ग्रेडिंग युनिटकाटोल, नरखेड, कळमेश्वर तसेच अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व त्यालगतचा भाग हा संत्रा उत्पादनासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. हंगामात बाजार समितीत संत्रा, मोसंबीची मोठी आवक व उलाढाल होते. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीडून ४.५० कोटी रुपये खर्चत ग्रेडिंग व क्लिनिंग युनिटची उभारणी होणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या कामासाठी १०० टक्के निधीची उपलब्धता झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.