Soil Testing Benefits: आधुनिक तंत्रज्ञानासोबत शास्त्रीय शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मृदा व जल परीक्षणाची सुविधा आवश्यक आहे. सामाजिक दायित्व निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली अत्याधुनिक माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले..काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलात चंबल फर्टीलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडच्या वतीने उभारण्यात आलेल्या माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या हस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते..Soil Fertility Management: उसाच्या जोमदार वाढीसाठी पूर्वमशागत महत्त्वाची.यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, कृषी अधीक्षक अभियंता मिलिंद ढाके, चंबल फर्टीलायझर्सचे विपणन उपव्यवस्थापक अशोक गंगवाल, ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निकम, कृषी उद्योजक दीपक मालपुरे, कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. महानंद माने, चंबलचे अधिकारी संजय यादव व विशाल हिंगणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अनिल निकम, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, बाजार समिती संचालक विनोद चव्हाण व संजय घोडके तसेच तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे आदी उपस्थित होते..Soil Testing: ‘माती परीक्षणामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर शक्य’.दादा भुसे म्हणाले, की माती परीक्षणामुळे पिकांसाठी आवश्यक खतांचे प्रमाण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आणि योग्य पीक नियोजनाबाबत अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे अनावश्यक खतांचा वापर आणि उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता व आरोग्य टिकवून ठेवता येईल..चंबल फर्टीलायझर्सचे अशोक गंगवाल म्हणाले, की शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, शास्त्रीय शेतीचा प्रसार करण्यासाठी आणि कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ही माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा मैलाचा दगड ठरेल..कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च कृषी शिक्षण उपलब्ध होत असल्याचे सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.