Relief For Farmers After Snowfall In Kashmir: काश्मीर खोऱ्यातील मैदानी भागात शुक्रवारी या हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली. तर उंचावरील भागांत पुन्हा हिमवृष्टी झाली. संपूर्ण काश्मीर खोरे गारठले आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सफरचंद फळबागांसाठी ही हिमवृष्टी पोषक मानली जात आहे. .नवीन झालेल्या हिमवृष्टीनंतर जम्मू- काश्मीरच्या सहा जिल्ह्यांसाठी हिमस्खलनाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राजौरी जिल्ह्यातील सर्व शाळांना २३ जानेवारी रोजी सुट्टी देण्यात आली..Soilless Farming: मातीविना शेती पद्धतीचे तंत्र.हिमवृष्टीमुळे हवाई आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. श्रीनगर विमानतळावरील विमान वाहतूक दिवसभर अधूनमधून विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सायंकाळी उशिरा हिमवृष्टीला सुरूवात झाली. रात्रभर अधूनमधून हिमवृष्टी सुरूच होती. श्रीनगरमध्ये बर्फाचा पातळ साचला आहे. उत्तर आणि दक्षिण काश्मीरच्या अनेक परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे..Agriculture Crisis: हवामान बदलाचा फटका; पाऊस, हिमवृष्टीअभावी उत्तराखंडमधील शेती धोक्यात, सफरचंद उत्पादन घटणार.ताज्या हिमवृष्टीमुळे रस्ते आणि हवाई वाहतूक प्रभावित झाली. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टीमुळे बंद झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात २२ ते २६ जानेवारी दरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभाव राहील. यामुळे मैदानी आणि उंच भागात हिमवृष्टी आणि पाऊस पडू शकतो. .सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासाहिमवृष्टीमुळे सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दिवसाच्या तापमानात असामान्य वाढ झाल्याने सफरचंद झाडांच्या नुकसानीची भीती निर्माण झाली होती. पण आता हिमवृष्टीमुळे सफरचंद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे येथील बागायतदार शेतकरी सांगतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.