Nashik News: गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे ‘कसमादे’तील धरणांसह इतर जलसाठे अजूनही तुडुंब भरले आहेत. जानेवारीअखेर धरणांमध्ये जवळपास ८० टक्के जलसाठा आहे. उपलब्ध जलसाठा १५ जुलैपर्यंत पुरवावा लागणार आहे. चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, गिरणा, पुनंद, माणिकपुंज या धरणांमधून पिण्याबरोबरच सिंचनासाठी आवर्तन मिळणार आहे. उन्हाळी कांद्यासह फळपिकांना आवर्तनाचा फायदा होईल. .शिवाय विहिरी व धरणांमधील जलसाठे पाहता उन्हाळ्यात देखील पाणीटंचाई भासण्याची शक्यता धूसर आहे. अतिवृष्टी व मुबलक पावसामुळे कसमादेतील तलाव, पाझर तलाव, शेततळे, नद्या, नाले व धरणे तुडुंब भरली होती. विविध नद्यांमधील जलसाठे डिसेंबरअखेरपर्यंत कमी प्रमाणात का होईना वाहत होते..Dam Water Storage: धरणांमधील जलसाठा आता ८६.४७ टक्क्यांवर.कसमादेत परतीचा पाऊसदेखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे डिसेंबरपर्यंत तुडुंब भरले होते. परिणामी, जानेवारीअखेर देखील चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या व पुनंद या पाच धरणांमधून आवर्तन सोडण्याची वेळ आली नाही. या सर्व धरणातून पहिले आवर्तन फेब्रुवारी महिन्यात सोडले जाऊ शकेल. सोडण्यात येणारे आवर्तन पिण्यासाठी व सिंचनासाठी संयुक्त असणार आहे..Dam Water Storage : नाशिकमधील सर्व धरणे तुडुंब .कसमादेतील अनेक भागांमध्ये विहिरींना अजून चांगले पाणी आहे. थंडी चांगली पडत असल्याने गहू, हरभरा हे पीक जोमात आहे. विहिरींमधील उपलब्ध पाणी व धरणांमधून मिळणारे आवर्तन यामुळे या वर्षी देखील कसमादेत उन्हाळी कांद्याची जम्बो लागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणी अजूनही कांदा लागवड सुरू आहे..निसर्गाने साथ दिल्यास उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन होऊ शकेल. विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे व धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पाहता आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्रता जाणवण्याची शक्यता खूपच कमी आहे. किरकोळ वाड्या-वस्त्यांचा अपवाद वगळता या वर्षी उन्हाळ्यात पाण्याचे टँकर नजरेस पडणार नाहीत, असे मानले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.