कर्नाटकात ऊसदरावर अखेर तोडगा निघालाउसाला प्रतिटन ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा नऊ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागे घेतले.Karnataka Sugarcane Price: कर्नाटकात ऊसदरावर अखेर तोडगा निघाला आहे. कर्नाटक राज्य सरकारने उसाला प्रतिटन ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. यामुळे बेळगाव, बागलकोट आणि विजापूर येथे गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागे घेतले. .गेल्या वर्षी येथील उसाचा दर प्रतिटन ३,२०० रुपये होता. त्यात आता १०० रुपये वाढ करण्यात आली आहे. बंगळूर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि साखर कारखानदार यांची शुक्रवारी बैठक झाली. यात सुमारे सात तास चर्चा झाली. या बैठकीत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या एफआरपीव्यतिरिक्त, राज्य सरकारकडून ५० रुपये आणि कारखानदारांकडून ५० रुपये असे मिळून १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला..Karnataka Sugarcane Protest: बेळगावात ऊसदर आंदोलन पेटले, हत्तरगी टोल नाक्याजवळ दगडफेक, मंत्र्यांच्या कारवर चप्पला भिरकावल्या."सरकार आणि कारखानदारांनी प्रत्येकी अतिरिक्त ५० रुपये मिळून उसाला प्रतिटन ३,३०० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे," असे सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी संध्याकाळी बंगळूरमध्ये जाहीर केले. ही रक्कम शेतकऱ्यांचा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च वगळून असेल. हा दर सर्व प्रकारच्या ऊस उत्पादनांना लागू असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. .Sugarcane FRP: ‘एफआरपी’पेक्षा १०० रुपये अधिकचा दर.यानंतर लगेचच, बेळगावातील शेतकरी नेत्यांनी ऊसदराचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले होते. त्यांनी बेळगावातील हुक्केरीजवळचा महामार्ग रोखून धरला होता. येथे दगडफेक करण्याच्या घटना घडल्या. यामुळे वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, पोलिसांनी काहींना अटक केली..कर्नाटकात ८१ साखर कारखाने असून त्यात ११ सहकारी, एक सरकारी मालकीचा आणि ६९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, विजापूर, विजयनगर, बिदर, गदग, हुबळी-धारवाड आणि हावेरी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी ३० ऑक्टोबरपासून आंदोलन करत होते. उसाला प्रतिटन ३,५०० रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पण ३,३०० रुपयांवर तोडगा काढण्यात आला आहे.."साखर कारखान्यांनी ११.२५ टक्के उतारा असलेल्या उसाला प्रतिटन ३,२५० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात तोडणी आणि वाहतूक खर्च वगळण्यात आला आहे. त्यात सरकारने अतिरिक्त ५० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. .कर्नाटकात २०२४ मध्ये ५.६ कोटी मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते. यावर्षी उत्पादन सुमारे ६ कोटी मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.