Karnataka Sugarcane Bill News: कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १० दिवसांच्या आत थकित प्रतिटन अतिरिक्त १०० रुपये बिलाची रक्कम जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष कुरुबूर शांतकुमार यांनी सांगितले, म्हैसूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या ऊस दराची अतिरिक्त रक्कम पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. .शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी जी. लक्ष्मीकांत रेड्डी यांनी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. .याबाबत माहिती देताना शांतकुमार यांनी सांगितले की, उपायुक्तांनी बैठकीत आश्वासन दिले आहे की सरकारने उसासाठी निश्चित केलेले प्रतिटन अतिरिक्त १०० रुपये देण्यासाठी वित्त विभागाने निधी आधीच जारी केला आहे..Sugarcane Crushing Season: ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याचा राज्यात विक्रम.पुढील हंगामापासून ऊस तोडणी नोंदणीसाठी दर महिन्याला प्राधान्यक्रमाने यादी जारी करायला हवी. त्यानुसारच काटेकोरपणे ऊस तोडणीचे नियोजन केले पाहिजे. या निर्देशाचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्तांनी दिला आहे..Sugar Sale Quota: फेब्रुवारीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक साखर विक्री कोटा.यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे कालव्यांमधून पाणी सोडून तलाव भरण्याची आणि गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली. .कर्नाटक राज्य सरकारने चालू हंगामाच्या सुरुवातीला उसाला प्रतिटन ३,३०० रुपये दर जाहीर केला होता. यासाठी बेळगाव, बागलकोट आणि विजापूर येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. राज्यात गेल्या हंगामात उसाचा दर प्रतिटन ३,२०० रुपये एवढा होता. त्यात यंदा १०० रुपये वाढ केली. केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या एफआरपीव्यतिरिक्त, राज्य सरकारकडून ५० रुपये आणि कारखानदारांकडून ५० रुपये असे मिळून १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.