कर्नाटकातील कलबुर्गी, बिदर, विजापूर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसानशेतकऱ्यांना सरकारकडून प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई जाहीरएक हजार कोटी रुपयांचे पीक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज केंद्राकडे मदत मागण्याचा राज्य सरकारचा निर्णय.Karnataka Floods: कर्नाटकातील कलबुर्गी, बिदर, विजापूर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Chief Minister Siddaramaiah) यांनी मंगळवारी (दि.१ ऑक्टोबर) पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी नुकसान भरपाई जाहीर केली. .मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, कल्याण आणि कित्तूर भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई दिली जाईल. ही नुकसान भरपाई राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) नियमांनुसार दिल्या जाणाऱ्या भरपाईपेक्षा अधिक असेल..Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर ८,५०० रुपयांऐवजी १७ हजार रुपये भरपाई मिळेल..Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ.सिंचनाखाली असलेल्या शेतजमिनीतील पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति हेक्टर १७,५०० रुपयांऐवजी २२,५०० रुपये मिळतील. अनेक जलस्रोतांचा वापर करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३१,००० रुपये दिले जातील. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या अतिरिक्त भरपाईमुळे राज्याच्या तिजोरीवर २ हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असे मुख्यमंत्री म्हणाले..यंदा कलबुर्गी, बिदर, यादगीर, विजापूर, बेळगाव, बागलकोट, धारवाड आणि गदग येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अतिवृष्टीव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे कलबुर्गी, विजापूर आणि यादगीर जिल्ह्यातील शेतपिकांचे नुकसान झाले असल्याचा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे..त्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टीमुळे सुमारे ९.६० लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी ९५ टक्के बाधित शेतकरी हे उत्तर कर्नाटकातील आहेत. कलबुर्गी, विजापूर आणि यादगीर जिल्ह्यातील ११७ गावांना पुराचा फटका बसला. जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ८० शिबिरे उभी केली. विविध भागात पावसाशी संबंधित घटनांमध्ये सुमारे ५२ जणांचा मृत्यू झाला..कर्नाटकात पिकांचे १ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाजप्राथमिक माहितीनुसार, कर्नाटकात १ हजार कोटी रुपयांचे पीक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच, रस्ते, पूल, बॅरेज आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. संयुक्त सर्वेक्षण केल्यानंतर सर्वांना योग्य ती भरपाई दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अतिरिक्त निधीची मागणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाईल, असेही सिद्धरामय्या म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.