Karnataka CM DK Shivakumar Memorandum To PM Modi: पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी आणि चारा टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) अंतर्गत २२ हजार ४०० कोटी रुपयांची मदत तातडीने मंजूर करुन निधी वितरित करावा, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. याबाबत त्यांनी आज (दि. १३ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले..यासोबतच, त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला. उसाला अधिक चांगला भाव मिळावा आणि इथेनॉल वाटपात त्यांना योग्य वाटा मिळावा, यादेखील मागण्या त्यांनी मांडल्या. २०२६-२७ च्या गळित हंगामासाठी उसासाठी प्रतिटन ३ हजार ६५० रुपये इतकी एफआरपी निश्चित केली आहे. पण शेतकऱ्यांची प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दराची मागणी आहे. त्यासाठी साखरेच्या किमान विक्री मुल्यात (एमएसपी) वाढ करावी. तसेच इथेनॉल आणि इतर उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन धोरणात्मक सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली..Drought Relief Maharashtra: दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मदतीसाठी थेट तालुका स्तरावर यंत्रणा.कस्तुरीरंगन अहवालांतर्गत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सिटिव्ह झोन) अधिसूचनेवर फेरविचार करावा. प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करावे आणि या भागात राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेचे रक्षण करत असताना कर्नाटक सरकारशी सल्लामसलत करावी, अशी विनंती त्यांनी केली..Drought Crisis: संकट मोठे असले, तरी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये : कृषिमंत्री .५८ लाख हेक्टरवरील शेतपिकांना फटका; ६२,४८२ कोटींचे नुकसान बंगळूरमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, कर्नाटकात गेल्या ७० वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात कमी पावसाची नोंद झाली. राज्यातील २४० पैकी २२६ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळाचा सुमारे ५८ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांना फटका बसला. यामुळे ६२,४८२ कोटी रुपयांचे नुकसानीचा अंदाज आहे..केंद्र सरकार राज्य सरकारच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल. पायाभूत सुविधांचा विकास करणे, शेतकरी हितांचे निर्णय आणि स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारसोबत सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्यास कर्नाटक सरकार कटिबद्ध आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.