Karnataka Seeks MSP For Natural Rubber Crop: नैसर्गिक रबर पिकाच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर या पिकाला किमान आधारभूत किंमत (MSP) देण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. कर्नाटक राज्यातील रबर पिकाला हमीभाव देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे शिफारस केली जाईल, अशी माहिती राज्याचे फलोत्पादन मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी विधानसभेत दिली. .याबाबत भाजप आमदार भागीरथी मुरुल्या यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मल्लिकार्जुन यांनी सांगितले की, रबर पीक हे केंद्राच्या रबर मंडळाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या पिकाबाबत कोणताही हा निर्णय केंद्र सरकारनेच घ्यायला हवा. चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी रबर पिकाची लागवड करत नसल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यावर उत्तर देताना, मंत्री म्हणाले की, राज्य सरकार रबर पिकासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी करेल..याआधी, भागीरथी यांनी दरात घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केरळच्या धर्तीवर रबर पिकासाठी हमीभाव देण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. .Rubber Farming : गुजरातची नजर रबर लागवडीवर.गेल्या काही वर्षात दर घसरल्याने कर्नाटकातील रबर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नैसर्गिक रबरसाठी प्रतिकिलो २५० रुपये एमएसपी जाहीर करावी आणि नैसर्गिक रबराला शेतमाल म्हणून घोषित करावे, अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. .केरळ सरकारकडून रबर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५०० कोटींची तरतूद .कर्नाटकात नैसर्गिक रबराच्या दरात गेल्या काही वर्षांत २६.३१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. नैसर्गिक रबराचा दर २०११ मध्ये प्रतिकिलो २४७ रुपय होता. २०२५ मध्ये हा दर १८२ रुपयांपर्यंत खाली आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. .भारतातील रबर उत्पादन हा शेती क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे ऑटोमोटिव्हपासून बांधकामासारख्या उद्योगांना हातभार मिळतो. देशातील उष्णकटिबंधीय, विशेषतः दक्षिण आणि ईशान्येकडील प्रदेशांतील हवामान रबर लागवडीसाठी पोषक मानले जाते. रबर उत्पादनात केरळ आघाडीवर आहे. तर या उत्पादनात कर्नाटकचा तिसरा क्रमांक लागतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.