Panjim News : राष्ट्रीय नारळ परिषदेचा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून भविष्यात तयार होणारे धोरणात्मक निर्णय व उत्पादन पद्धती देशभरातील नारळ बागांच्या विकासाला चालना देणारे ठरतील असा आशावाद कर्नाटकचे कृषिमंत्री एन. चलूवरयस्वामी यांनी व्यक्त केला. परिषदेच्या दुसऱ्या चर्चासत्राला त्यांनी विशेष हजेरी लावली. .आमदार रविकुमार, आमदार माधोजी देवेगौडा, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक व्यासपीठावर होते. किडींचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांचा अभाव, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची वानवा, निर्यातीच्या सुविधा व जमिनीची धूप अशा समस्या दक्षिण भारतातील नारळ बागांपुढे उभे आहेत. .Coconut Farming : कल्पवृक्ष गोव्यासाठी....सर्व राज्यांसाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीची अंमलबजावणी, नारळ नीरा तसेच प्रक्रियेला प्रोत्साहन द्यायला हवे. कर्नाटकात सहा लाख हेक्टरवर नारळ क्षेत्र असले तरी हवामान बदलामुळे घटलेली उत्पादकता चिंताजनक आहे असे श्री. एन. चलूवरयस्वामी म्हणाले.चर्चासत्रात वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.वैभव शिंदे, डॉ. ए. आर. फलेरो, सिंधुदुर्ग नारळ संघाचे सचिव आनंद हुले, रत्नागिरीच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, नारळ उत्पादक हर्षल प्रभुदेसाई, सचिन तेंडुलकर, समीर प्रभूखानोलकर यांनी भाग घेतला. .Coconut Intercropping : नारळ बागेत आंतर पीकपद्धती फायदेशीर.डॉ. शिंदे म्हणाले, की नारळ बागेत अन्नद्रव्य व सिंचन व्यवस्थापन चुकल्यास आर्थिक फटका बसतो. बागांमध्ये आंतरपिके तसेच योग्य वाणाची निवड हे देखील कळीचे मुद्दे आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘बाणवली’ जातीची शिफारस प्राधान्याने केली जाते. ही जात उंच असून सात वर्षांनंतर फळ देणारे झाड पुढे १२० वर्षे टिकते. त्यात खोबऱ्यातील तेल प्रमाण ६७ टक्के असून, प्रक्रियेसाठी उत्तम असल्याचेही डॉ. शिंदे म्हणाले..तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्सखासगी रोपवाटिकांमधील लागवड साहित्य काळजीपूर्वक तपासावे.नारळ विकास मंडळाच्या योजनांचा अभ्यास व लाभ घ्यायला हवा.पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन चुकल्यास नफा घटतो.नारळ बागेत योग्य आंतरपीक अत्यावश्यक ठरते.बागेत ठिबकसह तुषार सिंचनाचा वापर महत्त्वाचा.कीड नियंत्रणासाठी योग्य निरीक्षण व एकात्मिक व्यवस्थापन हवे.कीडनाशकांचा अनावश्यक वापर टाळावा. मित्रकीटकांना जपावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.