Weather Impact: पंढरपूर तालुक्यातील करकंबच्या पश्चिम भागातील अनेक गावांना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. वाऱ्याच्या तडाख्याने केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांतील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले..सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आलेल्या वादळामुळे उंबरे, करोळे, कान्हापुरी, जळोली, पेहे, सांगवी, नांदोरे आदी गावांमध्ये मोठे नुकसान झाले. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. .Banana Crop Damage: रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटींचे नुकसान.उंबरे येथील बलभीम चौगुले यांची पावणेदोन एकरांवरील केळीबाग उद्ध्वस्त झाली, तर करोळे येथील मोहन गायकवाड यांचीही केळीबाग भुईसपाट झाली. परिसरातील बहुतांश केळीबागांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे..Banana Crop Damage: सातपुड्याच्या पायथ्याच्या केळी बागा जमीनदोस्त.वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. कान्हापुरी येथील काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी बसविलेल्या सौर पॅनेलच्या प्लेटाही उडून गेल्या. अनेक गावांतील विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला..तहसीलदारांचे पंचनाम्याचे आदेशउंबरे गणाचे पंचायत समिती सदस्य शहाजी मुळे यांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली. नुकसानीची माहिती आणि छायाचित्रे पाहिल्यानंतर तहसीलदारांनी संबंधित गावांतील तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमर इंगळे, सीताराम पाटील व प्रथमेश बोंगे उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.