Jalgaon News : खानदेशात धुळे जिल्हा कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस चांगला राहिला, पण दर कमी असल्याने धुळ्यासह जळगाव व नंदुरबारमध्ये कांदा लागवड घटली आहे. कांदा रोपे विक्रीसही कमी प्रतिसाद मिळाला असून, अनेक रोपवाटिकाचालकांना नफा हाती फारसा राहिलेला नाही. .धुळ्यात १० हजार हेक्टरवर, जळगावात सुमारे तीन हजार हेक्टर आणि नंदुरबारमध्ये दीड हजार हेक्टरवर कांदा पीक आहे. उशिराची लागवड अजूनही सुरू आहे. पण ही लागवड आता फारशी होणार नाही. यामुळे क्षेत्रात मोठी वाढ दिसणार नाही..Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता.यंदा जुलै आणि ऑगस्टमध्येही कांदा लागवड कमी झाली होती. जुलै व ऑगस्टमधील पावसाचा खंड व आता अतिपावसानेही नुकसान झाले. धुळे, नंदुरबार व जळगावात आता पाऊस चांगला झाला. पण हा पाऊस कांदा पिकास मारक ठरला आहे. कांद्यासह खानदेशात वांगी, कोबी, गिलके, मुळा, कारली, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाल्याचे उत्पादनही अधिक घेतले जाते. पाण्याची उपलब्धता आहे. पण कांद्याऐवजी अन्य पिकांनाही पसंती मिळाली आहे.\.Onion Cultivation: जुन्नर तालुक्यात बेड पद्धतीने कांदा लागवडीकडे कल.धुळ्यातील क्षेत्रात घटधुळ्यात रब्बीतील कांद्याचे क्षेत्र सुमारे २० टक्क्यांनी घटले आहे. जळगाव जिल्ह्यातही कांदा लागवड घटली आहे. ज्यांनी कांद्याचे रोप वाढविले, त्यांच्या रोपांची हातोहात विक्री झाली नाही. कारण अनेकांनी लागवड टाळली. .धुळ्यात कांद्याचे धुळे आणि साक्री तालुक्यात, जळगावात यावल, चाळीसगाव, चोपडा भागांत मोठे उत्पादन घेतले जाते. धुळ्यातील न्याहळोद, कापडणे, देवभाने, सरवड, नंदाणे, बुरझड, बोरीस, निकुंभे, लामकानी, दुसाणे, निजापूर, जैताणे हा कांदापट्टा म्हणून ओळखला जातो. या भागांसह खानदेशात विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी स्थिर आहे. पण कमी दरांमुळे लागवडीस फटका बसला आहे..रोपवाटिकादेखील होत्या मुबलकखानदेशात खरिपाच्या तुलनेत रब्बीत कांद्याची लागवड अधिक प्रमाणात होते. खरिपासाठी शेतकरी जून, जुलै व उशिराच्या लागवडीसाठी ऑगस्टमध्येही कांद्याचे बियाणे रोपवाटिकांत टाकतात. यंदा रोपवाटिकादेखील बऱ्यापैकी आहेत. रोपवाटिकेत एक दीड महिन्यात रोप पुनर्लागवडीसाठी तयार होते. मध्यंतरी कांदा दरात सुधारणा झाली, पण नंतर दर कमी झाले. यामुळे कांदा लागवड फारशी वाढली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.