Sugarcane Crushing Capacity: शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा आणि ऊस पळवापळवीचे संकट टाळता यावे, यासाठी कादवा कारखान्याचे २५०० वरून ३५०० टीसीडी गाळप क्षमतेपर्यंत विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे गाळप क्षमता वाढण्याबरोबरच उत्पादन खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले..कादवा सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. त्या वेळी ते बोलत होते..Sugarcane Season 2026: ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करण्यास 'स्वाभिमानी'चा विरोध; १० ऑक्टोबरला २५ वी ऊस परिषद, राजू शेट्टींची घोषणा.शेटे म्हणाले, ‘‘२००७ मध्ये कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. त्या वेळी कारखाना आर्थिक संकटात होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ठेवी देऊन पतसंस्था उभी केली आणि त्यातून कारखाना पुन्हा सुरू झाला. पहिल्या पंचवार्षिकमध्ये कारखान्याला आर्थिक स्थैर्य मिळाले. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये १२५० टीसीडी क्षमतेचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता २५०० टन करण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यात आला.’’.Sugar Recovery: साखर उतारा वाढविण्यासाठी कारखाना पातळीवरील उपाययोजना.कारखान्याचे २५०० वरून ३५०० टीसीडी गाळप क्षमतेपर्यंत विस्तारीकरण हाती घेण्यात आले आहे. या कामाचा डीपीआर ११७ कोटी रुपयांचा असून, विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकरी उत्पादन कमी असल्याने उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले..गणपतराव पाटील यांनी यंदा उशिरा गाळप सुरू करण्याचा ठराव मांडला. सभेत सर्वाधिक ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, दत्तात्रेय पाटील, प्रवीण जाधव, प्रशांत कड, दत्तू भेरे, कमलेश बोडके, सुनील पाटील, शिवाजीराव बस्ते आदी उपस्थित होते. शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले..विरोधी गटाकडून कारभारावर सवालविरोधी गटातर्फे सुरेश डोखळे, नरेंद्र जाधव, सचिन बर्डे व रवींद्र मोरे यांनी चर्चेत सहभाग घेत संस्थेच्या कारभाराबाबत विविध सवाल उपस्थित केले. पुरेसा ऊस उपलब्ध नसताना विस्तारीकरण करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. चर्चेत गणपतराव पाटील, रावसाहेब भालेराव, संपत कोंड, रवींद्र मोरे, शिवानंद संधान, संपत कावळे, बबनराव देशमुख, प्रशांत जमधडे, सुभाष मातरे, तानाजी पगार आदींनी सहभाग घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.