Nashik News : कादवा कारखान्याच्या विनाशिक : कादवा कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी घेतलेले कर्ज पूर्ण परत फेडले असून इथेनॉल प्रकल्पाचा फक्त एक हप्ता बाकी आहे. कारखान्यावर कोणतेही कर्ज थकीत नाही. ऊस लागवड वाढल्यास कारखाना विस्तारीकरणासह सीएनजी व पोटॅश प्रकल्प राबवेल, असे प्रतिपादन कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले..मातेरेवाडी (ता. दिंडोरी) येथील कादवा कारखान्याच्या सन २०२५-२६ या ४९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. शेटे बोलत होते. प्रारंभी सौ. व देविदास पवार, सौ. व रमेश दिघे, सौ. व शशिकांत गामणे, सौ. व निवृत्ती चौधरी आणि सौ. व शरद माळी यांच्या हस्ते बॉयलर पूजन पार पडले..Sugar Factory Project: महाराष्ट्र निवडक पंधरा कारखान्यांत सीबीजी प्रकल्प.पुढे बोलताना श्री. शेटे म्हणाले, की उत्तर महाराष्ट्रात ‘कादवा’ने उसाला सर्वाधिक भाव दिला आहे आणि ही परंपरा कायम राहील. या जास्तीत जास्त ऊस गाळप होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ऊस तोडीचे नियोजन करण्यात आले आहे. या वेळी खासदार भास्कर भगरे यांनी ‘कादवा’ची आदर्शवत वाटचाल सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात चांगला भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. .सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, माजी संचालक संजय पडोळ, युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी मार्गदर्शन केले..AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवा .या वेळी बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, सर्व संचालक, साहेबराव पाटील, विलास कड, अनिल देशमुख, अशोक वाघ, किसन भुसाळ, जनार्दन उगले, राजेंद्र उफाडे, वसंतराव कावळे आदींसह प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर, सर्व अधिकारी, युनियन पदाधिकारी, कामगार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते..ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदतजास्तीत जास्त ऊस लागवड करत कादवाला ऊस पुरवठा करावा. यासह आता एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पन्न वाढवणे काळाची गरज आहे. कारखाना शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. तरी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कादवाला ऊस पुरवठा करावा, असे आवाहन श्री. शेटे यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.