Nashik News : कादवा सहकारी साखर कारखान्याने सातत्याने ऊस उत्पादकांचे हित जपत, त्यांना चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कारखान्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, तसेच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवावे, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले..कादवा सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी सर्वाधिक ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेटे यांनी प्रास्ताविकात २००७ पासून कारखान्याची वाटचाल मांडली.कर्जबाजारी कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणून गाळप क्षमता दुप्पट करण्यात आली, .AI In Sugarcane Farming : ‘एआय’च्या वापरासाठी ऊस उत्पादक शेतकरी आले पुढे.इथेनॉल प्रकल्प सुरू झाला आणि सध्या कारखान्यावर कोणतेही कर्ज थकीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात सीबीजी, सीएनजी, पोटॅश, हायड्रोजन व सौर प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले. शासनाच्या निर्देशानुसार ३,००० रुपये एफआरपी अदा केल्याचेही त्यांनी सांगितले. .AI In Sugarcane Farming : ‘एआय’ तंत्राने ऊस उत्पादनावाढ शक्य.गेली चार वर्षे संस्थेला सातत्याने लेखा परीक्षणात''अ'' वर्ग मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सभेत विरोधी गटातर्फे सुरेश डोखळे यांनी साखर उत्पादन व नफा घटल्याचे मुद्दे उपस्थित केले,तर सचिन बर्डे यांनी रिकव्हरी-आधारित एफआरपी, वाहतूक व उत्पादन खर्च वाढीबाबत प्रश्न विचारले. यावर आक्रमकपणे उत्तरे देत शेटे यांनी सर्व आरोप फेटाळले..शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावीअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ‘शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी’ असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, शिवसेना संपर्कप्रमुख सुनील पाटील, बाजार समिती सभापती प्रशांत कड, योगेश बर्डे, शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, बोपेगाव सरपंच वसंत कावळे, राज्य बँक व्यवस्थापक जे. डी. केदार, कोलवडकर, तपासणी अधिकारी नरेंद्र पाटील, हाके आदींसह सभासद, कारखान्याचे अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.