Farmers Financial Crisis: जुन्नर तालुक्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे खोरे तसेच मढ खोरे आणि तळेरान परिसरात यंदा भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टी, सततचे पावसाचे वातावरण तसेच भातपीक निसवणी आणि दाणे भरण्याच्या वेळी पावसाने मारलेली दडी यामुळे भातपीक वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. .त्यामुळे प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच जुन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सोनाबाई दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबन तांबे, पंचायत समिती सदस्य आशा डावखर आणि निलम आमले यांनी केली आहे..Paddy Crop Damage: भोरमध्ये अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान.या भागातील खरीप हंगामातील पीक चांगले आले असतानाच निसवणी आणि काढणीच्या टप्प्यावर पावसाने अडथळा निर्माण केला. दाणे भरण्याच्या वेळी पाऊस न आल्याने भाताच्या लोंब्या लहान निघाल्या असून, दाण्यांची प्रतवारी आणि उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भातपिकाचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना बाजारात अपेक्षित भाव मिळणार नसल्याची भीती आहे. उत्पादन खर्चही भरून निघण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे..Paddy Crop Damage: पावसाचा भात पिकाला फटका.तातडीने सर्वेक्षण आवश्यकतळेरान, मढ खोरे, कोपरे, मांडवे आणि मुथाळणे परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे करावेत. नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाच्या निकषांनुसार मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचेपिकांचे नुकसान केवळ उत्पादनापुरते मर्यादित नसून, बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, मजुरी आणि काढणीचा खर्च शेतकऱ्यांनी आधीच केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून तातडीने मदत देणे गरजेचे आहे..शेतकऱ्यांचा आर्थिक ताळेबंद बिघडलाभात हे या खोऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख खरीप पीक आहे. त्यामुळे भातपिकाचे नुकसान झाल्यास संपूर्ण खरीप हंगामाचा आर्थिक ताळेबंद बिघडतो. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पंचनामे, नुकसानभरपाईचा प्रस्ताव आणि प्रत्यक्ष आर्थिक मदत या तीनही बाबींवर कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.