Tourism Update: जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धबधबे, गडकिल्ले, घाटमाथा आणि अन्य पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, याबाबत आंबेगाव-जुन्नरच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी अधिसूचना जारी केली आहे..गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, धबधबे आणि घाट परिसरात दुर्घटनांचा धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, हातवीज येथील कांचन धबधबा, नाणेघाट येथील रिव्हर्स वॉटरफॉल, शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर आणि निमगिरी किल्ले तसेच आंबेगाव तालुक्यातील आहुपे, डिंभे धरण, कोंढवळ, पोखरी घाट आणि भीमाशंकर मार्गावरील धबधब्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत..Malshiras Road Accident: माळशिरस वाहन अपघातप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीत .तसेच धबधबे, धरणे आणि नदी परिसरात सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत..Animal Transport Rules: जनावरांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे.प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना या आदेशांचे काटेकोर पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहन केले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी दिला आहे..पर्यटनस्थळांवरील निर्बंधवेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहण्यास मनाई.धबधब्याखाली जाणे तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा चित्रीकरण करण्यास बंदी.मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेशास मनाई.धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे तसेच बेदरकार वाहनचालना करण्यास बंदी.सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे व महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई.डीजे, ध्वनीक्षेपक तसेच वाहनांवरील स्पीकर मोठ्या आवाजात वाजविण्यास मनाई.प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.