Tomato and cabbage prices decline: संकरित टोमॅटो व कोबीचे बाजारभाव घसरल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत करून सिंचनाचे योग्य नियोजन करून उत्पादित केलेल्या शेतमालाला मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने दुष्काळात तेरावा महिना, अशी उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे..जुन्नर, आंबेगाव तालुक्याच्या मध्यभागातील मीना, कुकडी व घोड नदीच्या काठालगतच्या शेतजमिनीत शेतकऱ्यांनी विविध भाजीपाला पिके घेतली आहेत. सद्यःस्थितीत मेथी, कोथिंबीर या भाज्यांना उच्चांकी बाजारभाव मिळत आहे..Kharif Onion Price: नव्या खरीप कांद्याच्या आवकेने दरावर दबाव.चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यालाही बाजारभाव चांगला मिळत आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून आर्यमान, विरांग या जातीच्या संकरित टोमॅटोचे व कोबीचे बाजारभाव घसरले आहेत. यामुळे सद्यस्थितीत ज्या शेतकऱ्यांची टोमॅटोची तोडणी सुरू आहे, कोबीचे पीक काढणीस तयार झाले आहे, असे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. .Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी.सद्यस्थितीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात संकरित (हायब्रीड ) टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) प्रतवारीनुसार ३० रुपये ते शंभर रुपयांच्या दरम्यान ( दीड रुपया ते पाच रुपये किलो) भाव मिळत आहे. कोबीला प्रति किलोग्रॅम एक रुपया ते तीन रुपयांच्या दरम्यान मातीमोल भाव मिळत आहे..ऑगस्ट महिन्यात एक एकर क्षेत्रात बत्तीस हजार कोबीच्या रोपांची लागवड केली होती. सुमारे एक लाख रुपये भांडवली खर्च झाला होता. सध्या कोबीला प्रति किलोग्रॅम एक ते तीन रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. या बाजारभावात कोबी विक्रीसाठी पाठवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने कोबी आज मेंढपाळाला मोफत मेंढ्या चारण्यासाठी दिला आहे. रवींद्र शिंगोटे, कोबी उत्पादक, खामुंडी, ता. जुन्नर.नारायणगाव उपबाजारात आर्यमान या संकरित जातीचे तीनशे क्रेट टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. तोडणी मजुरी, वाहतूक खर्च आदींसाठी प्रतिक्रेट ७० रुपये खर्च झाला. तेवढाच बाजार मिळाल्याने निराशा झाली.प्रमोद कानडे, टोमॅटो उत्पादक, कळंब, ता. आंबेगाव..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.