Agri Market: सध्या बाजारात ज्वारीला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढला असतानाही त्याच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे..ज्वारी पिकासाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी तसेच मशागत यावर मोठा खर्च करावा लागतो. एका एकरासाठी साधारण ३४ हजार रुपये खर्च येत असताना, उत्पादनातून मिळणारे उत्पन्न केवळ ४४ हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प नफा मिळत असून अनेकवेळा तोट्यालाच सामोरे जावे लागत आहे..Jowar Price Loss: दादर ज्वारी दरात घसरण.यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने ज्वारी उत्पादनावरही परिणाम झाला आहे. काढणीच्या वेळी पडलेल्या पावसामुळे धान्याची गुणवत्ता खालावली असून बाजारात दर आणखी कमी मिळत आहेत. ज्वारी काढणी व मळणीसाठी मजुरी खर्च वाढला आहे. एका बाजूला मजुरांचे दर वाढले असताना दुसऱ्या बाजूला बाजारभाव स्थिर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काढणीसाठी हार्वेस्टर व इतर यंत्रसामग्रीचा वापर करावा लागत असल्याने अतिरिक्त खर्च वाढत आहे..Jowar Harvest: करमाळा तालुक्यात ज्वारी काढणीला वेग.सध्या बाजारात ज्वारीला प्रति क्विंटल ३,००० ते ४,००० रुपये दर मिळत आहे. मात्र, हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे शासनाने हमीभाव वाढवावा तसेच ज्वारी खरेदीसाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे..रब्बी हंगामातील ज्वारी हे मुख्य पीक असून मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. मात्र, वाढलेला मजुरी खर्च, काढणी, मळणी व बांधणीवरील खर्च यामुळे ज्वारी पीक परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे..वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने आम्ही आर्थिक अडचणीत सापडलो आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी अमोल भोसले यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.