Solapur News: अक्कलकोट तालुक्यातील जेऊर आणि तडवळ परिसरातील अनेक गावांत यंदाच्या हंगामात ज्वारीच्या पेरण्या महिनाभर उशिरा झाल्या. त्यामुळे हुरडा तयार होण्याचा हंगाम लांबला आहे. हुरड्याचा भाव सध्या तब्बल ४०० रुपये किलो म्हणजेच ४० हजार रुपये क्विंटल आहे. तर हुरड्यानंतर महिनाभराने तयार होणाऱ्या ज्वारीचा भाव केवळ चार हजार रुपये क्विंटल आहे. हुरड्याचीच विक्री करणे अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत..जेऊर व परिसरातील अनेक गावात यंदा पावसाळा खूप लांबला. पेरण्या लांबल्याने सध्या हुरड्याचा हंगामही लांबलेला आहे. जानेवारीच्या मध्यानंतर किंवा फेब्रुवारी महिन्यात हंगाम जोरदार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे..Hurda Jowar : हुरडा ज्वारी उत्पादनाचे गवसले तंत्र.हुरड्याच्या हंगामानंतर सुद्धा महिना दीड महिना ज्वारीच्या पिकाची राखण करून ज्वारी हे तीन ते चार हजार रुपयाला प्रतिक्विंटल विकण्यापेक्षा चांगल्या दर्जाच्या हुरड्याची निर्मिती करून सध्या सुरू असलेल्या ४०० ते ५००रुपये किलो याप्रमाणे हुरडा विक्री केल्यानंतर प्रतिक्विंटल चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त नफा हुरडाविक्रीतून मिळतो..Jowar Hurda Benefits : आरोग्यदायी ज्वारीचा हुरडा.वर्षभर मिळणार हुरडाखास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या सरकार, कचकची, सुरती यासह इतर सुधारित वाणाची लागवड करावी आणि टप्प्याटप्प्याने लागवड करावी. त्याची योग्य देखभाल केल्यास चांगल्या दर्जाचा हुरडा विक्रीस उपलब्ध होऊ शकतो. .सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे, त्यामुळे हुरडा भाजण्याची शास्त्रीय पद्धत विकसित करणे, त्याचा साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यास त्यामुळे हुरड्याची उपलब्धता वर्षभर होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.