Jowar Farmers Issue: सध्या शेतशिवारात ज्वारीच्या काढणीची लगबग सुरू झालेली आहे. मात्र ज्वारी काढणीतच शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत आहे. शेतकऱ्यांना एकरी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे..कधी अपुऱ्या पावसामुळे तर कधी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी वार्षिक गणित कोलमडत चालले आहे. परिणामी शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. खते, बी-बियाण्यांचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्या तुलनेत शेतीमालाला भाव मात्र मिळत नाहीत, त्यात मजुरांची टंचाई सालगड्यांचे वाढते पगार,काठीचा खर्च इतर विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडेनासे झाले आहे..Jowar Price Loss: दादर ज्वारी दरात घसरण.ज्वारीचे पीक काढण्यासाठी एकरी आठ ते दहा हजार रुपये लागत आहे. या वर्षी सालगड्यांचे पगार दीड ते पावणे दोन लाखावर गेले आहेत. शेती कामाला मजूर मिळत नाहीत. महिलांना चारशे तर पुरुषांना सहाशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. पर्यायाने शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळले आहेत. उन्हातान्हात काम करण्याऐवजी बांधकाम व्यावसायांकडे मजुरांचा अधिक ओढा आहे. या वर्षी सालगड्यांचे पगार सव्वा ते पावणे दोन लाख रुपयांवर गेले आहेत. .Jowar Fodder Price: यंदा ज्वारीचा कडबा महागला.शेती उत्पन्नाचा खर्च वाढल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीचा ठरत आहे. शेतीसाठी दोन-तीन सालगड्यांची आवश्यकता असायची परंतु आता एकाच सालगड्यावर शेती व्यवसाय केला जातो आहे. आता बैल बारदाना शेतावर आणि सालगडी गावात अशी स्थिती आहे, शेतावर जागली राहिल्या नाहीत, मागेल तेवढा पगार देऊनही सालगडी शेतात मुकामी राहत नाहीत. सततचा दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कमी-अधिक होत असलेले भाव, बैलांच्या वाढलेल्या किंमती, मजुरांचा अभाव, वाढत्या बी-बियाणांच्या किमती या व इतर अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बैलबारदाना मोडीत काढला आहे. लहान शेतकऱ्यांना नोकर ठेवणे परवडत नाही..त्यामुळे बटाईने शेती करावी लागत आहे. सध्या रब्बीतील गहु, ज्वारीच्या काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. बाहेरून मजुर आणावे लागत आहेत. त्यातच या पिकांत उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. रानडूक्कर, हरिण यांसारख्या वन्यप्राण्यांच्या उपद्रव वाढला आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीचा ठरत आहे..ज्वारी सध्या बाजारात आवक सुरु झाली असून गेल्या महिन्यात क्विंटलमागे २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये भाव होता. सध्या २ हजार ४०० ते २ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.- संतोष पवार, अडत व्यापारी, जळकोट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.