संतोष मुंढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात व विशेषतः गल्लेबोरगाव शिवारात मागील पाच वर्षांपासून रब्बी ज्वारीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. ज्वारी व कडब्याला दरही सातत्याने चांगले मिळत असल्याने कमी खर्चात व कमी पाण्यात हे पीक शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावताना दिसत आहे. पुरेसा चारा उपलब्ध होऊ लागल्याने दुग्ध व्यवसाय व त्याचबरोबर खवा निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. सहजिकच गल्लेबोरगावच्या शिवारात ज्वारीचा बोलबाला दिसून येत आहे. .Jowar farming in Maharashtra villages: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात गल्लेबोरगावसह, पळसवाडी, चिंचोली, आखतवाडा, शेकापूरी, खाजपूर, वेरूळ, कसाबखेडा आदी सुमारे १५ ते २० गावांमध्ये रब्बी ज्वारीचे क्लस्टर तयार झाले आहे. खुलताबाद व कन्नड तालुक्याच्या सीमेवरील काही गावे देखील यात समाविष्ट आहेत. यातील गल्लेबोरगावचे प्रातिनिधिक उदाहरण घेता येईल.गावाची लोकसंख्या सुमारे साडेचार हजारांवर असून, खरिपाचे क्षेत्र १२६४ हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र सुमारे ६१९ हेक्टर आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून १० एकरांपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. मका, तूर, मूग, कपाशी, रब्बी ज्वारी, हरभरा ही हंगामी पिके, तर पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू, अत्यल्प प्रमाणात चिकू, मोसंबी ही पिकेही शेतकरी घेतात..Jowar Farming: चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी बहरली.पाच वर्षांत ज्वारी क्षेत्राचा विस्तारगल्लेबोरगाव शिवारात यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र विस्तारल्याची माहिती कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी संजय ढबाले यांनी दिली. ते म्हणाले, की खरिपात मका आणि रब्बीत ज्वारी असा येथील शेतकऱ्यांचा ‘पॅटर्न’ आहे. सन २०२१-२२ ते २०२५- २६ या पाच वर्षांचा विचार करता ३९६ हेक्टरपासून सुरू झालेले रब्बी ज्वारीचे क्षेत्र ४९७ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी विस्तार केंद्राचे अधिकारी रामेश्वर ठोंबरे म्हणाले की गल्ले बोरगावच्या शेतकऱ्यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी सुपर मोती वाणाच्या लागवडीवर अधिक भर दिला आहे. या वाणापासून धान्य व कडबा असेही दोन्हीही उत्पादन चांगले मिळते..पळसवाडी, खामगाव आदी गावांतील शेतकरीही या वाणाची लागवड करीत आहेत. काही शेतकरी लागवडीसाठी गादीवाफा पद्धतीचाही वापर करू लागले आहेत. एकरी उत्पादकताही तीन- चार वर्षांत वाढली असून, आठ ते नऊ क्विंटल प्रति एकर पिकणारी रब्बी ज्वारी आता सुधारित वाण व तंत्र वापरामुळे कोरडवाहू स्थितीत दहा ते बारा क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. काही बागायती रब्बी ज्वारी उत्पादक १५ ते २३ क्विंटल प्रति एकर उत्पादनापर्यंतही पोहोचल्याचे शेतकरी व कृषी विभाग सांगतो. कृषी विभागाच्या स्रोतानुसार मागील पाच वर्षांत ज्वारीला प्रति क्विंटल ३१००, ३४०० रुपयांपासून ते मागील वर्षापर्यंत ४०००, ४५०० ते अगदी ४९०० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. मध्य प्रदेशातील मजुरांमुळे पीक काढणीला आधार मिळतो. कापणी- मळणी करून देण्यासाठी एकरी सात ते आठ हजार रुपयांची मजुरी घेतली जाते..Jowar Farming: राज्यात वर्षागणिक ज्वारीच्या क्षेत्रात घट !.कडबाही खातोय भावगावातील ज्वारी उत्पादक अशोक फुलारे म्हणाले की आमच्या शिवारात बाराशे एकरांहून जास्त क्षेत्रावर रब्बी ज्वारी आहे. उत्पादन खर्च कमी आणि मिळणारा चांगला दर यामुळे अलीकडील वर्षात त्याचे क्षेत्र विस्तारले आहे. यंदा ज्वारीचे दर क्विंटलला साडेचार हजारांच्या पुढे गेले आहेत. कडबाही चांगलाच भाव खातोय. तीन वर्षांपूर्वी त्याला १७०० ते २२०० रुपये प्रति शेकडापर्यंत दर होते. यंदा हाच कडबा २५०० ते ३१०० रुपये दराने विकला जात आहे..पळसवाडीत क्षेत्र वाढतेयपळसवाडी शिवारातही यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र सुमारे २६८ हेक्टरवर पोहोचले आहे. येथील शेतकरीही पारंपरिक वाणासोबतच परभणी मोती, परभणी सुपर मोती, परभणी शक्ती तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फुले सुचित्रा या वाणांची पेरणी करतात.कोरडवाहू स्थितीत एकरी सुमारे आठ ते बारा क्विंटल, तर बागायती क्षेत्रामध्ये सुमारे २३ क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी साध्य केले आहे. मळणी झाल्यानंतर स्वच्छता व प्रतवारी करून व्यापाऱ्यांना ठोक किंवा वेगवेगळ्या सोसायटीमध्ये मागणीनुसार ज्वारीची विक्री केली जाते. घृष्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचा या कामी मोठा हातभार आहे..Jowar Harvest: करमाळा तालुक्यात ज्वारी काढणीला वेग.दुग्ध व्यवसाय व खवा निर्मितीची जोडरब्बीत ज्वारीच्या रूपाने चारा मुबलक मिळू लागल्याने गल्लेबोरगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. शंभुराजे समूह गोपालन दुग्ध व्यवसाय, महालक्ष्मी समूह गोपालन, राजमाता समूह शेळी पालन व गोपालन, शिवकन्या समूह गोपालन दुग्ध व्यवसाय, कृषी कन्या समूह दुग्ध व्यवसाय, समीक्षा समूह दुग्ध व्यवसाय, राजमाता समूह शेळीपालन, आदर्श समूह गाय व शेळी पालन असे संघटन तयार झाले आहे..त्या माध्यमातून सुमारे साडेचारशे शेतकरी दुग्ध व्यवसाय व शेळीपालनाशी जोडले गेले आहेत. एक शेतकरी कुक्कुटपालनात असून, नाबार्डच्या माध्यमातून १४ शेतकरी गट कार्यरत आहेत. याशिवाय साठ बचत गटही गावशिवारात कार्यरत आहेत. वर्षभर कमी अधिक प्रमाणात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २५ ते ३० शेतकरी खवा निर्मितीत उतरले असून, त्याची ठोक विक्री करू लागले आहेत. एक व्यक्ती शेतकऱ्यांकडून खव्याची थेट खरेदी करून छत्रपती संभाजीनगर शहरातील ग्राहकांना पुरवठा करते. त्यामुळे दूध उत्पादकांच्या पदरात अधिकचे पैसे पडण्यास मदत होत आहे.रामेश्वर ठोंबरे ९४२०४०६९०१(विभागीय कृषी विस्तार केंद्र अधिकारी, छत्रपती संभाजीनगर).Jowar Farming: कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पीक निसवले.सुरुवातीला आम्ही तीन-चार शेतकऱ्यांनी परभणी सुपर मोती या वाणाची निवड केली. उत्पादन खर्च परवडत असल्याने आमच्या प्रेरणेतून अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.तुळशीराम औटे ९९२३७४३३८२.आमची ३२ एकर शेती आहे. पैकी पाच ते आठ एकरांपर्यंत दरवर्षी रब्बी ज्वारी असते. परभणी सुपर मोती वाण आमच्या पसंतीस पडले आहे. यंदा जास्तीच्या पावसामुळे शिवारात तीन टप्प्यांत रब्बी ज्वारीची पेरणी झाली.ज्ञानेश्वर भगत ९४२१४१२७५०.आमच्या तीन एकरांतील शेतीत खरिपात मका आणि रब्बीत ज्वारी अशी दोनच पिके घेतो. मागील वर्षी तीन एकर परभणी सुपर मोती वाण होते. एकूण लागवड क्षेत्रातून ५५ क्विंटल ज्वारी मिळाली. लासूर स्टेशनच्या बाजारात ३८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. यंदाही तीन एकर ज्वारी असून, पीक परिस्थिती आजच्या घडीला चांगली आहे.कचरू दांगोडे.रब्बी ज्वारीचे क्षेत्र असलेल्या खुलताबाद तालुक्यातील ९० टक्के क्षेत्र गल्लेबोरगाव आणि परिसरातील गावांमध्ये आहे. दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच दुधावर प्रक्रिया करणारे उद्योगही परिसरामध्ये सुरू झाले आहेत. दररोज साडेतीन क्विंटलच्या आसपास खवा निर्मिती गल्लेबोरगाव परिसरामध्ये सुरू झाली आहे.डी. एस. तारगे ७५८८३ ३४०५५ तालुका कृषी अधिकारी, खुलताबाद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.