Washington News: सरकारी खर्चाच्या अनुषंगाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जागतिक महासत्ता पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या खाईमध्ये कोसळली आहे. अनेक सरकारी कार्यक्रम आणि सेवा ठप्प झाल्याने देशभरात नोकर कपातीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेतील साडेसात लाख कर्मचाऱ्यांना कदाचित सुटीवर पाठविले जाऊ शकते तर काहींना नोकरीवरूनही काढून टाकले जाण्याचा धोका बळावला आहे..अनेकांनी आता अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली असून काही गोष्टी या पूर्ववत करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या खर्चाबाबत तोडगा काढण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपर्यंतची डेडलाइन होती पण ती ओलांडण्यात आल्याने हा पेच आणखी वाढला. देश ठप्प व्हावा अशी आमची इच्छा नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे..Employment Guarantee Scheme : रोहयोअंतर्गत केवळ ६० प्रकरणांना मंजुरी लक्ष्य १५००.ट्रम्प यांनी आर्थिक पेचाच्या अनुषंगाने तोडगा काढण्यासाठी मागील आठवड्यामध्येच काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती पण त्यांना डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांच्यात सामंजस्य घडवून आणण्यात अपयश आले होते. सरकारी खर्चाच्या अनुषंगाने तोडगा काढण्यात ट्रम्प हे सलग तिसऱ्यावेळी अपयशी ठरले आहेत..Rural Employment : गवतविक्रीतून मिळतोय रोजगार.डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी ट्रम्प यांच्या अजेंड्याला आक्षेप घेतला आहे. आरोग्य सेवांसाठीच्या निधीला अतिरिक्त अंशदान देण्यात यावे म्हणून हा पक्ष विशेष आग्रही आहे. व्हाइट हाउसमधील बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांना वंशवादी ठरविले..ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कारकीर्दीमधील (२०१८) शटडाउन हे ३५ दिवसांचे होते. मेक्सिकोच्या सीमेवर अवाढव्य भिंत उभारण्याचा घाट त्यांनी घातला होता पण अमेरिकी काँग्रेसने त्यासाठी निधी द्यायला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. या शटडाउनमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला अकरा अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. ताज्या शटडाउनचा जबर तडाखा शिक्षण क्षेत्राला बसणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.