Dharashiva News: यंदा दमदार पावसामुळे रब्बी हंगामाला संजीवनी मिळाली असून, ज्वारीचे पीक सध्या जोमात आले आहे. शेतशिवारात मोत्यासारखी डोलणारी कणसे पाहून खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दुःख बळीराजा विसरू लागला आहे. सध्या ज्वारी हुरड्यात आली असून, पाखरांना हुसकावण्यासाठी गोफणीचे आवाज आणि शेतकऱ्यांच्या आरोळ्यांनी परिसर दुमदुमला आहे..अतिवृष्टीमुळे खरिपातील उडीद, मूग आणि सोयाबीनसारखी नगदी पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता; मात्र रब्बीतील भरघोस पिकाने या नुकसानीवर मलमपट्टी केली आहे..Jowar Farming: ढगाळ हवामानात ज्वारीवर कोणत्या कीडरोगांचा धोका असतो?.तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५४ हजार १०८ हेक्टर असून त्यापैकी १९ हजार ५६५ हेक्टर क्षेत्र रब्बीखाली आहे. यावर्षी ६ हजार ८७६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जेवळी, आष्टा कासार, अचलेर, माकणी, सास्तूर आणि सालेगाव परिसरातील काळी कसदार जमीन रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे..Jowar Farming: खानदेशात कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी जोमात.नदी-नाले, तलाव आणि लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने जमिनीत मुबलक ओलावा आहे. त्यामुळे ज्वारीची कणसे दुधात भरली असून, हुरड्याचा हंगाम रंगात आला आहे. पण दाणे टिपण्यासाठी पाखरांचे थवे शिवारात दाखल होत आहेत..पीक वाचविण्यासाठी शेतकरी गोफण फिरवणे, लोखंडी डबे वाजवणे, फटाक्याची आतषबाजी, तसेच बुजगावणी उभी करणे असे विविध उपाय करीत आहेत.दरम्यान, हुरडा पार्ट्यांमुळे शिवारात नात्यांचा गोडवा वाढला आहे. गरमागरम हुरडा, गावरान जेवण आणि गप्पांच्या फडामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.