Marathwada Rainfall and Dam Update: जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने मंगळवारी (ता. ४) सायंकाळी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.प्रारंभी १० हजार क्युसेकने सुरू झालेला हा विसर्ग मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत १९,०२६ क्युसेक, तर बुधवारी (ता. ५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास २८,१३४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. धरणाचे १० ते २७ क्रमांकाचे एकूण १८ दरवाजे उघडून हा विसर्ग करण्यात येत आहे..विसर्ग सुरू करताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाचे संचालक जयंत गवळी, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, सहायक अभियंता (श्रेणी-१) श्रद्धा निंबाळकर, सहायक अभियंता (श्रेणी-२) आर. पी. भोजने आदी अधिकारी उपस्थित होते..Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!.जायकवाडी धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता सुमारे १०२ टीएमसी आहे. मंगळवारी (ता. ४) दुपारी ३ वाजेच्या सुमारास धरणातील एकूण पाणीसाठा ९५.८५ टीएमसी, तर उपयुक्त पाणीसाठा ७६.८७ टीएमसी इतका झाला होता. त्या वेळी धरण ९१.४ टक्के भरले होते. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी १,००० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्याच वेळी धरणात सुमारे ४७,०८४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती..Maharashtra Dam Outflow : कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्गात घट.धरणातील पाण्याच्या आवकेनुसार गोदावरी नदीपात्रातील विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट करण्यात येईल, अशी माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्ष, पैठण यांनी दिली..दरम्यान, गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गादरम्यान नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही. गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उत्तर), पैठणचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.