Water Resources Update: मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात नाशिक विभागातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आवकेत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. २४) दुपारी १२ वाजेपर्यंत ९७ हजार ९८७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा ३४.१८ टक्क्यांवर पोहोचला असून, ही आवक मराठवाड्यासाठी दिलासादायक मानली जात आहे..मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीही जायकवाडी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी नगर आणि नाशिक भागातून सोडलेल्या पाण्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली होती. .Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय.त्यानंतर पावसाने खंड दिल्याने पाणीसाठा वाढण्याचा वेग मंदावला. मात्र नाशिक परिसरात पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला असून, त्याचा फायदा जायकवाडीला होत आहे..Agricultural Irrigation Equipment: गोदापात्रात पाणी वाढताच सिंचन साहित्य हलविण्यासाठी धावपळ.शुक्रवारी पहाटे २ वाजता जायकवाडीत २,२०३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. सकाळी ९ वाजेपर्यंत ती ९ हजार क्युसेक झाली. सकाळी १० वाजता आवक वाढून ५१ हजार ४४३ क्युसेक झाली, तर दुपारी १२ वाजता ती ९७ हजार ९८७ क्युसेक इतकी नोंदविण्यात आली..दरम्यान, शुक्रवारी नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ८२ हजार ६६५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. सकाळी ८ वाजता त्यात ६,२७० क्युसेक वाढ करून एकूण विसर्ग ८८ हजार ९३५ क्युसेक करण्यात आला. दुपारी २ वाजेपर्यंत हा विसर्ग ९४ हजार क्युसेक करण्यात आला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.