Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वांत मोठे जायकवाडी धरण तुडुंब होण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी (ता. २९) धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.३० टक्के झाला होता, तर विसर्ग १८ गेट उघडून ३७ हजार ७२८ क्युसेकने सुरू होता. त्या वेळी धरणात २८ हजार ६११ क्युसेकने आवक सुरू होती. .याबाबत धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी धरणातील जलसाठा ९५.०५ टक्के झाला होता. २४ ऑगस्टला जायकवाडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा ९६.३७ टक्के झाला होता. त्या वेळी प्रकल्पात १५,९२० क्युसेकने आवक सुरू होती, त्याच वेळी ४,१९२ क्युसेकने गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. .Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ.याच दिवशी सकाळी १० ते १०:३० च्या दरम्यान आधीच्या विसर्गात ५,२४० क्युसेकने घट करून तो ४१९२ क्युसेक करण्यात आला होता. २५ ऑगस्टला आवक वाढल्याने रात्री ८ ते ८.३० च्या दरम्यान १० दरवाजे अर्धा फूट उघडून ५,२४० क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. त्या वेळी जायकवाडीतून १८ गेटमधून ते अर्धा फुटाने उघडून ९,४३२ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जात होता. बुधवारी (ता. २७) सकाळी ३७,८२८ क्युसेकने विसर्ग सुरू होता. .त्या वेळी धरणात १८,८३४ क्युसेकने आवक सुरू होती. बुधवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे दीड फुटावरून २ फूट उघडून ९,४३२ क्युसेक विसर्ग वाढवून तो ३७ हजार ७२८ क्युसेकने गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आला. त्या वेळी धरणात १६,८२४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सातच्या सुमारास धरणातील आवक तब्बल ८२,३०३ क्युसेकवर पोहोचली होती. त्या वेळी १८ गेट अडीच फूट उघडून ४७ हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरू होता. .Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातून विसर्ग वाढविला.गुरुवारी रात्री दहा वाजता गेट तीन फूट उघडून विसर्ग ५६,५९२ क्युसेक करण्यात आला. त्या वेळी धरणातील साठा ९८.७९ टक्के होता. शुक्रवारी (ता. २९) पहाटे एकच्या सुमारास १८ गेट तीन फुटांवरून साडेतीन फूट उघडत विसर्ग ६६ हजार २४ क्युसेक करण्यात आला. शुक्रवारी सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान पुन्हा सर्व उघडलेले गेट चार फूट उघडत विसर्ग ७५ हजार ४५६ करण्यात आला. तो दुपारी १२ वाजताही कायम होता..नदीकाठच्या गावांना दक्षता बाळगण्याचे आवाहनधरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पासून सातत्याने नदीपत्रात पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येत आहे. सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला की काही भागांमध्ये पाणी शिरते हा अनुभव आहे. नदीपात्रातच पाणी वाहते आहे. आवकेनुसार पाण्याचा विसर्ग कमीअधिक करण्यात येणार असून नदीपात्रात पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगण्याची सूचनाही धरण प्रशासनाने केली आहे..जायकवाडी धरणपाणी स्थिती (२९ ऑगस्ट २०२५)उपयुक्त पाणीसाठा... ९८.३०%विसर्ग... ७५,४५६ क्युसेक (१८ गेट, ४ फूट उघडले)आवक... २८,६११ क्युसेकविसर्ग (२९ ऑगस्ट सकाळी)... ७५,४५६ क्युसेक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.