Water Conservation: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत सोलापूर विभागात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. या अभियानांतर्गत विविध योजनांमधून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे पोहोचली आहेत. .जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५-२६ अंतर्गत जलसंधारणाच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सोलापूर विभागात एकूण ३,२०८ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे..Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत चांगेफळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन.यापैकी २,७०१ कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली असून सर्व कामांसाठी जवळपास १८४.३५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत ३,१८८ कामांना कार्यादेश देण्यात आले असून २,१५२ कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. एकूण खर्चाचा विचार करता, आतापर्यंत २,३५२ कामांवर सुमारे १४.३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे..Water Conservation : जलयुक्त शिवार आराखड्यात २६८८ कामे प्रस्तावित .ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी या अभियानात विविध कामांना प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने शेततळी, गाळ काढणे आणि नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारण, जलसाठा वाढवणे आणि भूजल पुनर्भरण आदी कामे केली जात आहेत..सिंचन क्षमता वाढवण्यावर भर‘आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना’ अंतर्गतही विकासकामांना चालना देण्यात येत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील जलसाठा वाढवणे आणि सिंचन क्षमता वृद्धिंगत करण्यावर प्रशासनाचा भर आहे, त्यादृष्टीने आम्ही नियोजन करत आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.