Water Scarcity: जालन्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता
Water Shortage Issue: पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, निम्न दुधना प्रकल्पात केवळ दोन दलघमी पाण्याची आवक झाली आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पात अवघा २२ टक्के जिवंत पाणीसाठा असून, गतवर्षी याच काळात ४८.६६ टक्के जलसाठा उपलब्ध होता.