Jalna News: जालना : जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यात ‘संपूर्ण अभियान २.०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ बदनापूर येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. या अभियानाचा कालावधी २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ असा असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानाद्वारे १२५ गावांमध्ये सुमारे ७५ लाख रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी (CIF) विविध विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण कुचे होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम, जिल्हा नियोजन अधिकारी सूचित कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..Jalna Water Scarcity: जालना जिल्ह्यातील ५६२ गावांवर टंचाईचे सावट.प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी ‘संपूर्ण अभियान २.०’ चे उद्दिष्ट व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. या अभियानांतर्गत शिक्षण, पोषण, महिला व बालकल्याण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती, रोजगारनिर्मिती आदी क्षेत्रांत विशेष भर देण्यात येणार आहे. गावनिहाय नियोजन करून पायाभूत सुविधांची उभारणी, लाभार्थ्यांची नोंदणी, शिबिरे व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन आमदार कुचे यांनी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.. एम म्हणाल्या, जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने अभियानासाठी आवश्यक निधी व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आली..Jalna DPDC: जालना ‘डिपीडीसी’चा ४३६ कोटींचा आराखडा.कार्यक्रमास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आशा व अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.‘संपूर्ण अभियान २.०’मुळे तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.