Certificate Application: कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यात मंडळ स्तरावर आयोजित शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. १० ते १६ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ६२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण २९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. .कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र नोंदी व पुरावे उपलब्ध असलेल्या नागरिकांना अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील विविध मंडळ स्तरावर ही शिबिरे घेण्यात आली. जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर या चार उपविभागांतील विविध तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे..Income Certificate : उत्पन्न प्रमाणपत्रावर आता ‘क्यूआर कोड’.या शिबिरात भोकरदन उपविभागातून सर्वाधिक १३० अर्ज प्राप्त झाले आहेत. या शिबिरातून २९२ अर्ज प्राप्त झाले असून यापैकी २३८ अर्ज माजी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून, तर ५४ अर्ज हैदराबाद गॅझेटनुसार प्राप्त झाले आहेत..Income Certificate : उत्पन्न प्रमाणपत्रावर आता ‘क्यूआर कोड’.चार उपविभागांत ६२ शिबिरेजिल्ह्यातील चार उपविभागांत मिळून ६२ शिबिरे घेण्यात आली. जालना उपविभागात १५, अंबड उपविभागात १७, भोकरदन उपविभागात १७, तर परतूर उपविभागात १३ शिबिरे आयोजित करण्यात आली..या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांकडून कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.