Jalna Sand Mafia : जालना जिल्ह्यात अवैध वाळू व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या विरोधात महसूल, पोलिस व आर. टी. ओ. विभागाने कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. .जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जालना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांची दूरभाष्य परिषदेद्वारे महत्त्वाची बैठक घेतली..Illegal Sand Mining: अवैध वाळू साठ्यावर इसबावीत धडक कारवाई.या बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी महसूल, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वयाने काम करून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात तत्काळ व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक ही गंभीर बाब असून, यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.आरटीओ विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच संबंधित वाहने ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देण्यात आले..Illegal Sand Mining : अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर ‘एमपीडीए’अंतर्गत गुन्हे नोंदवा.यामुळे अशा वाहनांचा पुन्हा वापर होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. वारंवार अवैध वाळू चोरी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात कठोर भूमिका घेत एम. पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. अशा कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांना चाप बसेल, असेही सूचित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्रमुख टोल नाक्यांवर विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज नियमितपणे तपासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असेही सांगण्यात आले..या बैठकीत अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने व सक्रियपणे काम करण्याचे निर्देश देत, कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अंबड उपविभागात महसूल व पोलिस प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाबाबत ज्या पद्धतीने संयुक्त कारवाया केल्या आहेत त्याप्रमाणे सर्व तालुक्यात महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.