Jalna News: आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. १०) जिल्हा परिषद सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते..या कार्यशाळेची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी या उपक्रमाला दिशा व बळ दिले..Agriculture Workshop: शेतीसमोरील आव्हाने आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पुण्यात कार्यशाळा.कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी विकास अधिकारी श्री. बनसावडे यांनी प्रस्तावना करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. एफपीओ नोंदणी व कागदपत्रांविषयी नंदकिशोर अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. व्यवसाय उभारणी व सक्षमीकरण या विषयावर अमोल धवन यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री अन्नदाता आत्मनिर्भर अभियान याबाबत प्रकल्प संचालक आत्मा अमोल आगवण यांनी माहिती दिली..Agriculture Workshop: कृषी व्यवसाय क्षेत्रात उच्च शिक्षणाबाबत कार्यशाळा.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना व अर्थसाहाय्य संबंधित माहिती नोडल अधिकारी सचिन पांचाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. कृषी विभागाचे महाविस्तार एआय ॲप तसेच बदलत्या हवामानानुसार पीक व्यवस्थापन या विषयावर उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. .तसेच कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. राहुल कदम यांनी यशस्वी कृषी व्यवसाय करत असताना प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले..कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी बांधव तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.