Jalna News: जालना जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेकडो कोटींची खर्च केला जातो. हा निधी खर्चाचे नियोजन पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी स्थानिक आमदार, खासदार, समितीवरील सदस्या यांच्या शिफारशीवरून करतात. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मागील देयकासह ४३६ कोटींचा विकास आराखडा होता. मात्र, ३१ मार्चाला केवळ दोन महिने बाकी असताना आतापर्यंत केवळ १२३ कोटींचा खर्च झाला आहे. दरम्यान, निधी परत जाऊ नये, म्हणून तब्बल २४५ कोटींच्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेचा कारभार उरकून घेण्यात आला आहे. .जिल्ह्यात भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. मात्र, महायुतीची सत्ता आल्यापासून जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सुरवातीला छत्रपती संभाजीनगर येथील अतुल सावे आणि आता बीड येथील पंकजा मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे..Nanded DPDC: नांदेडला ७३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी .पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यापासून जिल्हा नियोजन समिती बैठक आणि ध्वजवंदनाकरिता जिल्ह्यात आल्या. जिल्ह्याच्या विकास निधी खर्चाचे नियोजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली केले जात आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागील आर्थिक वर्षाचे १२७ कोटी देयकासह ४३६ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता..त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात मोठा बदल होईल, असे अपेक्षित होते. परंतु, मागील दहा महिन्यांत केवळ १२३ कोटींचा निधी विकासकामांवर खर्च झाला आहे. यात मागील आर्थिक वर्षातील ३४ कोटी आणि चालू आर्थिक वर्षातील कामांवर ८९ कोटींचा खर्च झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. .Jalna DPDC : जालना जिल्ह्याच्या विकासाला गती! ४११ कोटींच्या आराखड्यास मंजुरी!.तर निधी परत जाऊ नये, म्हणून तब्बल २४५ कोटींच्या विकासकामांच्या प्रशाकीय मान्यता करून ठेवल्या आहेत. २४५ कोटींची ही कामे पूर्ण होण्यास पुढील वर्ष जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात जरी विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असली तर पुढील आर्थिक वर्षात निधी खर्च करून विकासकामे पूर्ण होणार असल्याचे चित्र आहे. .जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाल्यानंतर तो त्याच आर्थिक वर्षात खर्च झाला पाहिजे असा नियम आहे. परंतु, जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांना या नियमातून सूट आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेला निधी खर्चासाठी एक वर्षाचा अधिक वेळ दिला जातो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.